लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून सोन्याचांदीच्या दरात घसरण होऊ लागली होती. त्यामुळे सोन्याचा दर आणखी खाली येण्याची आशा ग्राहकांना वाटू लागली होती. मात्र, बुधवारी तसेच गुरुवारी पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. चांदीच्या दरात मात्र स्थिरता आहे. सध्या धातूंच्या दरात सतत चढउतार होत आहे. त्यामुळे सोन्याचे दर फारसे उतरणार नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, दर कमी जास्त होत असले तरी सोन्याची मागणी मात्र कमी झालेली नाही. सोन्याचे दर अधिक खाली येण्याची प्रतीक्षा ग्राहकांकडून केली जात होती. मात्र फारसे दर उतरणार नसल्याचे तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही व्यापाऱ्यांनी केले आहे.
सोने-चांदीचे भाव बदलतेजागतिक बाजारपेठेत अनिश्चिततेचे वातावरण पसरले असल्याने त्याचा परिणाम सोने-चांदीच्या बाजारभावावर होत आहे. कोरोना काळात भरमसाठ भाव वाढले. त्यानंतर रशिया-युक्रेन युद्धामुळेही सोन्याचे दर भरमसाठ वाढले. अधुनमधून दरात घसरण होताना दिसत असली तरीही त्यांच्या दरात पुन्हा वाढ होत असल्याचे दिसत आहे.
आकडे काय सांगतात ?जानेवारी सोने प्रति तोळा चांदी प्रति कि.१ जानेवारी ७६५०० ८७०००१ फेब्रुवारी ८२२०० ९५०००१ मार्च ८५००० ९५०००१ एप्रिल ९१२०० ९४०००
भाव कमी होण्याची शक्यता ?लग्नसराई जवळ आल्याने सोन्याच्या दरात घसरण झाली तर सोने खरेदी शक्य होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
भाव घसरण्याची कारणेट्रम्प इफेक्ट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त कर लावण्याचे धोरण आखल्याने त्याचा परिणाम भाव घसरण्यावर झाला.
"सोन्या-चांदीच्या दरात सध्या चढउतार होत आहेत. मात्र सोन्याची मागणीही वाढली आहे. त्यामुळे सोन्याचे दर फार खाली येतील अशी शक्यता नाही. ग्राहक पूर्वीप्रमाणेच सोन्याची खरेदी करीत आहेत. सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरणार अशी अफवा पसरविली जात आहे. नागरिकांनी यावर विश्वास ठेवू नये."- महेंद्र अल्लेवार सुवर्णकार, चंद्रपूर