लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना सुरू केली. या योजनेंतर्गत शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार होती. मात्र, जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे २०१५-१६ या मागील सत्राची शिष्यवृत्ती अद्यापही विद्यार्थ्यांना मिळालेली नव्हती. मात्र मुख्याध्यापक, पालकांच्या वारंवार तक्रारीनंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने नुकतेच जिल्ह्यातील ७ हजार ८६९ विद्यार्थ्यांची सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीचे १ कोटी ५७ लाख ३८ हजार रूपये सबंधीत शाळांकडे वळते केले आहे.विद्यार्थ्यांचे चुकीचे बँक खाते, आधार लिंक यासह अनेक कारणांमुळे ही शिष्यवृत्ती रोखून धरण्यात आली होती. आदिवासी विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती वाढावी, त्यांच्या शिक्षणात येणाºया अडीअडचणी लक्षात घेता राज्य शासनाने पाच वर्षापूर्वी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना सुरू केली. या योजनेची जबाबदारी आदिवासी विकास प्रकल्प विभागाकडे सोपविण्यात आली असली तरी मुख्य काम जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे आहे.या शिष्यवृत्ती अंतर्गत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक एक हजार रुपये, पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना दीड हजार आणि आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये शिष्यवृत्ती देय आहे. प्रारंभी मुख्याध्यापकाकडे अर्ज केल्यानंतर त्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रकम जमा केली जायची. कालांतराने या प्रक्रियेत बदल करण्यात आला. आॅनलाईन अर्ज करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या. बँकेत खातेही उघडण्यास सांगण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज सादर केले.मात्र कधी सर्व्हर डाऊन तर कधी लिंक फेल यामुळे अनेकांना अर्जच भरता आले नाही. त्यामुळे योजनेच्या लाभापासून त्यांना मुकावे लागले. ज्यांनी अर्ज बरोबर भरले, त्यांना बँकेत खाते उघडण्यास सांगण्यात आले. खाते उघडून शिक्षण विभागाला माहिती दिली. मात्र, ही माहिती अनेकांनी चुकीच्या पद्धतीने भरली. त्यामुळे गेल्या सत्राची शिष्यवृत्ती अद्यापही मिळालेली नव्हती. याबाबत अनेकांचे पालक मुख्याध्यापक, शिक्षकांकडे वारंवार चौकशी करीत होते. मुख्याध्यापकांनीही शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा केल्याने चंद्रपूर व चिमूर या दोन्ही प्रकल्पातील ७ हजार ८६९ विद्यार्थ्यांची १ कोटी ५७ लाख ३८ हजार रूपयाची शिष्यवृत्ती सबंधीत शाळांकडे वळती केली आहे.बँक खात्यासबंधीत विविध त्रुटींमुळे ही शिष्यवृत्ती रोखून धरण्यात आली होती. मात्र गतवर्षीच्या सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीची रकम नुकतेच विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर वळती करण्यात आली आहे.- संजय डोर्लीकरशिक्षणाधिकारी (माध्य). चंद्रपूर.
सुवर्ण महोत्सवी शिष्यवृतीचे दीड कोटी वळते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 1:33 AM
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना सुरू केली. या योजनेंतर्गत शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार होती. मात्र, जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे २०१५-१६ या मागील सत्राची शिष्यवृत्ती अद्यापही विद्यार्थ्यांना मिळालेली नव्हती.
ठळक मुद्देगतवर्षीची रकम : विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती जमा होणार