शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

गोंडवाना विद्यापीठ सामाजिक गतिशीलतेचे केंद्र व्हावे

By admin | Published: March 06, 2017 12:30 AM

गोंडवाना विद्यापीठ हे केवळ शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी यांचे केंद्र न राहता ते सामाजिक गतिशीलतेचे केंद्र व्हावे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांनी केले.

राजन वेळूकर : व्हिजन कॉन्फरन्सचे उद्घाटनचंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठ हे केवळ शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी यांचे केंद्र न राहता ते सामाजिक गतिशीलतेचे केंद्र व्हावे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांनी केले.चंद्रपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात गोंडवाना विद्यापीठाच्या पुढील २५ वर्षांच्या विकासाचा आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने ‘व्हिजन कॉन्फरन्स’चे आयोजन येथे करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. वेळूकर उद्घाटक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.व्ही. कल्याणकर होते.याप्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. पी. काणे, गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, डॉ. नितीन पुजार, डॉ. सुदर्शन कुमार, डॉ. अपूर्वा पालकर, डॉ. राजेश चंदनपाट, गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या डॉ. जीवतोडे व डॉ. जी.एन. कुलकर्णी आदी उपस्थित होते.या परिषदेत विद्यापीठाच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील पुढील वाटचालीची दिशा कशी असेल, याबाबत उपस्थितांनी आपली भूमिका मांडली. परिषदेला विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे समीर केने, डॉ. राजेश गायधने तसेच संलग्नित महाविद्यालयातील विविध महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाचे संचालक, प्राचार्य, प्राध्यापक, लोकप्रतिनिधी तथा विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.परिषदेच्या आयोजनामागील भूमिका परिषदेचे समन्वयक डॉ. एन.एस. कोकोडे यांनी मांडली. संचालन गोंडवाना विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी डॉ. आय.एस. मोहुर्ले यांनी केले. आभार प्रदर्शन परीक्षा नियंत्रक डॉ. जे.व्ही. दडवे यांनी केले. (प्रतिनिधी)