चंद्रपूर : अतिवृष्टीमुळे राज्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी दरड कोसळून, पुराच्या पाण्यात वाहून किंवा अन्य अपघातांनी शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचा दुर्दैवी मृत्यू अथवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच अन्यही घटना झाल्या आहेत. अशा वेळी कुटुंबाची वाताहत होऊ नये यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आधार मिळतो. त्यामुळे अशा कुटुंबीयांनी कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून विमा प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागाचे संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी केले आहे.
शेतकरी कुटुंबीयांच्या वारसदारांना आर्थिक मदत म्हणून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत एक ते दोन लाखांपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध आहे. अपघातग्रस्तांच्या वारसदारांनी कार्यक्षेत्रातील विमा प्रस्तावासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे संबंधित विभागांना प्राधान्याने उपलब्ध करून द्यावीत. जेणेकरून बाधित कुटुंबास विमा संरक्षणाचा लाभ शीघ्रतेने देता येईल. विमा प्रस्ताव तयार करण्याकरिता ऑक्झिलियम इन्शुरन्स ब्रोकिंग कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधींची मदत घ्यावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
बाॅक्स
येथे साधा संपर्क
टोल फ्री क्रमांक १८००२२०८१२