लोकमत न्यूज नेटवर्क्आक्सापूर : जिल्ह्यात दारूबंदीला तीन वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अनेक अवैध दारुविक्रेते दारुची विक्री करु लागले. त्यामुळे काही भागात पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर दारूबंदीसाठी प्रभावी अंमलबजावणी केली. यामध्ये गोंडपिपरीचे ठाणेदार प्रविण बोरकुटे यांनी मागील वर्षभरात गोडपिपरीत दारूबंदीसाठी विविध उपक्रम राबविले. अनेक दारुविक्रेत्यांवर कारवाई केली. तर शांततेत बाधा आणणाºया कंटकाविरोधात तडीपाराचा प्रस्ताव बनविला. परिणामी तालुक्यात दारुबंदी प्रभावी ठरली. त्यामुळे ठाणेदार बोरकुटे यांच्या कामगिरीची दखल घेत नागपूरचे विशेष पोलीस महानिरिक्षक मल्लीकार्जुन प्रसन्ना यांनी पोलीस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात ठाणेदार प्रविण बोरकुटेंचा यांचा सन्मान केला.चंद्रपूर जिल्ह्यात बंदीनंतरही दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने दारूबंदी फसवी ठरल्याचा आरोप होत आहे. तीन वर्षांमध्ये हजारो कारवाया करण्यात आल्या. तरीसुद्धा दारूला आळा घालण्यात पोलीस प्रशासनाला यश आले नाही. मात्र गोंडपिपरी तालुक्यात ठाणेदार प्रविण बोरकुटे यांनी दारुविक्रीविरोधात मोहिम उभारुन प्रभावी दारुबंदी केली. याचू दखल घेत नागपूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लीकार्जुन प्रसन्ना यांनी त्यांचा सत्कार केला.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत, शेखर देशमुख यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते.