लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी गोवर-रुबेलालस पूर्णत: सुरक्षित आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील ६२ हजार ५५३ बालकांचे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती महापौर अंजली घोटेकर यांनी दिली. महानगरपालिका स्थायी समिति सभागृहात सीटी टास्क फोर्स समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या.महानगरपालिका आरोग्य विभागाच्यावतीने गोवर रुबेला निर्मूलन मोहिमेत आजवर झालेल्या कामांचा आढावा व पुढे करण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेचे नियोजन सादर करण्यात आले. बालकांचे संरक्षण करणाºया लसीकरण मोहिमला २७ नोव्हेंबरपासून उत्साहाने प्रारंभ झाला. रूबेला लसीकरणाचे ७५ टक्के लक्ष्य पूर्ण करण्यात आले आहे. पाच आठवडे चालणाऱ्या या मोहिमेचा शाळांमधील लसीकरणाचा पहिला टप्पा पार पडला. पुढील आठवड्यात शाळाबाह्य मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. शेवटी लसीकरणापासून वंचित राहिलेल्या मुलांकडे लक्ष केंद्र्रित करण्यात येणार आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी विविध ६५ ठिकाणी लसीकरण शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील म्हणजेच १० वी पर्यंतच्या सर्व मुलांना गोवर रुबेला लस देण्यात येत असून नागरी आरोग्य केद्रनिहाय शाळांमध्ये लसीकरण करण्याचे सुयोग्य नियोजन महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. लसीकरण झाल्यानंतर विद्यार्थ्यांवर लक्ष दिले जात असून विद्यार्थ्यांच्या मनोरंजनाचीही व्यवस्था करण्यात येत आहे. मोहिमेदरम्यान कुठल्याही आकस्मिक परिस्थितीला तोंड देण्यास १०८ रूग्णवाहिकेची व्यवस्था मनपाकडून करण्यात आली आहे. आतापर्यंत गोवर रुबेला लसीकरण झालेली सर्व बालके सुरक्षित असून याबाबत सर्व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.इंदिरानगर, रामनगर, बालाजी वॉर्ड, बगड खिडकी, बाबूपेठ नेताजी चौक, भिवापूर सुपर मार्केट, तुकूम येथील आरोग्य केंद्रांवर एमआर लसीकरण केल्या जात आहे. यावेळी उपमहापौर अनिल फुलझेले, मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अंजली आंबटकर, लायन्स क्लबचे अध्यक्ष शैलेश बागल, आयएमए अध्यक्ष प्रमोद राऊत, डॉ. निवृत्ती जीवने, डॉ. नरेंद्र जनबंधू, शिल्पा मुळे, शोभा वानखेडे, लीनी बांगडे, मनोज येलमुले, अपर्णा कोल्हे, सुनीता कुळमेथे, सुकेशिनी बिलवणे, पुष्पा बनसोड, मंजुषा वºहाटे, डॉ. जयश्री वाडे, डॉ. अश्विनी भारत, डॉ. राजुरवार, डॉ. आकुलवार, डॉ. गर्गेलवार डॉ. विजया खेरा, डॉ. नयना उत्तरवार उपस्थित होते.
गोवर-रुबेला लसीकरण बालकांसाठी सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:23 AM
विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी गोवर-रुबेलालस पूर्णत: सुरक्षित आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील ६२ हजार ५५३ बालकांचे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती महापौर अंजली घोटेकर यांनी दिली.
ठळक मुद्देअंजली घोटेकर : २१ दिवसात ६२ हजार ५५३ बालकांचे लसीकरण