शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

नगर परिषदेकडून शासकीय निधीची उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2017 2:04 AM

देलनवाडी प्रभाग क्रं. ४ मध्ये रहिवासी नसलेल्या ठिकाणी डांबरी रस्ता आणि १५ ते २० वर्षांपासून वास्तव्य

ब्रह्मपुरी : देलनवाडी प्रभाग क्रं. ४ मध्ये रहिवासी नसलेल्या ठिकाणी डांबरी रस्ता आणि १५ ते २० वर्षांपासून वास्तव्य असलेला रस्ता दुर्लक्षित ठेवण्यात आल्याने नगर परिषदेकडून एक प्रकारे शासकीय निधीची उधळण केली जात आहे. ब्रह्मपुरी शहर देलनवाडी, आरमोरी रोड व वडसा रोड आदी भागात वाढत गेले आहे. या भागात १५ ते २० वर्षांपासून नागरिक वास्तव्यास आहेत परंतु या भागातील रस्त्यावर साधे खडीकरण केले जात नाही. य्याबाबत नागरिकांनी निवेदन दिले आहे. पण नगरसेवकांच्या दबावाखाली डावलल्या जात आहे. मुख्याधिकारी प्रशासन चालविण्यात कमी पडत आहे की काय, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. देलनवाडी प्रभागात काही भागातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. ते डांबरीकरण अर्र्ध्या भागात नागरिक राहत नाही, अशा ठिकाणी केले गेले आहे. त्या डांबरीकरणाचा उपयोग वॉकिंगसाठी केला जात आहे. तर दुसरीकडे वसाहतदार आहे. त्या रस्त्यावरुन हजारो नागरिक रोज वाहनाने अथवा पायी ये-जा करीत असता. पण त्या रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या रस्त्याचे काम करण्यास प्राधान्य दिले जात नाही. या रस्त्याचे काम करण्यासाठी पहिलांदा बांधकाम विभागाने त्याचे सर्वेक्षण केले नाही. तर काही नगरसेवक दबाव टाकून कामे केली जातात, असा नागरिकांचा आरोप आहे. घरभाडे, पाणीपट्टी भरण्यासाठी तगादा लावला जातो. परंतु मूलभूत सुविधा देण्यास नगर परिषद मागे पडली आहे. प्रशासनाने ही गंभीर बाजू तपासून घेऊन विकास कामांना प्राधान्य दिले पाहिजे. जनतेने निवडून दिलेले नगरसेवकच अशा पद्धती वागत असतील तर त्यांना नागरिक धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही, असाही सूर नागरिक बोलून दाखवित आहेत. मुख्याधिकारी यांनी अशा कामांवर लक्ष घालून प्राधान्याने कामे करावी, अशी मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)