आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : सध्या जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शासकीय कार्यालयातच्या भिंतीही याचीच साक्ष देत आहे. त्यामुळे आता शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करा, असे आदेश अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी सर्व कार्यालय प्रमुखांना दिले.जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उमेश नावाडे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, सामान्य रुग्णालय चंद्रपूर अंतर्गत अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कंलत्रे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यालये तंबाखू मुक्त करण्यासाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकाºयांनी आदेश दिले.या कार्यशाळेत जिल्हा सल्लागार डॉ. कैलाश नगराळे, दंत चिकित्सक डॉ. संदीप पिपरे यांनी ‘तंबाखूचे सेवन, त्याचे दुष्परिणाम, संबंधित कायदा व त्याची अंमलबजावणी’ यावर चित्रफितीच्या माध्यमातून सखोल मार्गदर्शन केले.अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात तंबाखू युक्त पदार्थाचे सेवन मोठ्या प्रमाणात असून अगदी शाळकरी मुलांपासून तर वृद्धापर्यंत लोक तंबाखूच्या दुष्परिणामांचे बळी पडलेले आहेत. मात्र यापुढे शासकीय कार्यालयातील कर्मचारी तंबाखूचे सेवन करणार नाही. सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करा, असे आदेशही कलंत्रे यांनी सर्व कार्यालय प्रमुखांना दिले.कार्यालय प्रमुखांनी या आदेशाच्या अंमलबजावणीकडे लक्ष द्यावे, असेही निर्देश दिले. त्याच प्रमाणे ‘पानठेला चालकांनी १८ वर्षाखालील मुलांना तंबाखूयुक्त पदार्थ विकणे कायद्याने गुन्हा आहे’ असे फलक लावण्याच्या सूचनाही यावेळी सचिन कलंत्रे यांनी दिल्या.
शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:25 PM
सध्या जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शासकीय कार्यालयातच्या भिंतीही याचीच साक्ष देत आहे.
ठळक मुद्देअतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : कार्यालय प्रमुखांनी अंमलबजावणी करावी