सद्यस्थितीत कोरोनाचे रुग्ण सात्यत्याने आढळत आहे. त्यामुळे पालक तसेच विद्यार्थ्यांमध्ये चितेचे वातावरण आहे. सोशल डिस्टन्स तसेच अन्य नियमांना पाळल्या जात आहे. मात्र शिक्षण विभागाने पर्यवेक्षकिय यंत्रणेमार्फत शाळा भेटी देण्याचे आदेश काढले आहे. यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. दरम्यान, शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनेनुसार शाळेत , शिक्षक व विद्यार्थी यांच्याशिवाय कोणलाही प्रवेश देण्यात येऊ नये, असे नमूद करण्यात आले आहे. यातच चंद्रपूर येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढून केंद्रप्रमुख, व विषयतज्ज्ञ यांना शाळेला भेटी देऊन विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन कार्यालयात अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे शासनाच्या आदेशाचे काय, असा प्रश्न आता शिक्षकांनी उपस्थित केला आहे. यावर वरिष्ठांनी त्वरित तोडगा काढण्याची मागणीही करण्यात आली आहे.
शासन आदेशाचा शिक्षण विभागाकडून खो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 4:26 AM