कान्हाळगाव (कोरपना) : कोरपना येथील तहसील कार्यालयातील तहसीलदारांचे शासकीय वाहन नादुरूस्त आहे. वाहन दुरूस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने तहसिलदारांना शासकीय कामकाज व दौऱ्यासाठी खासगी भाड्याच्या वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.तेलंगनाच्या सीमेवरील कोरपना तालुका हा आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त व मागासलेला तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात ५३ ग्रामपंचायती, एक नगर परिषद व ११३ गावांचा समावेश आहे. प्रशासकीय कार्यभाराच्या दृष्टिकोनातून भौगोलिक व लोकसंख्येच्या दृष्टीने या तालुक्याचे कार्यक्षेत्र मोठे आहे. परंतु येथील प्रशासन व्यवस्थेच्या प्रमुख अधिकाऱ्याचेच वाहन नादुरूस्त होऊन उभे आहे. त्यामुळे शासकिय कामकाज व दौऱ्यासाठी गेल्या १५ दिवसांपासून खासगी भाड्याच्या वाहनांचा वापर करावा लागत आहे. या वाहनांच्या दुरूस्तीसंदर्भात प्रशासनाकडून कुठलीच पावले उचलण्यात आली नाही. त्यामुळे वाहनांची दुरूस्ती नेमकी केव्हा होईल? याचे उत्तर कुणाजवळही सापडत नाही. याचा कामकाजावर परिणाम होत आहे. या शासकिय वाहनांची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)
कोरपना तहसीलदारांचे शासकीय वाहन आजारी
By admin | Published: January 10, 2015 1:05 AM