लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : संपूर्ण भारतातून मिजल्स (गोवर) आणि रुबेला आजाराचे उच्चाटन करण्याची केंद्र व राज्य सरकारची भूमिका आहे. १०० टक्के लसीकरण करणे हेच आपले अंतिम ध्येय असल्यामुळे चंद्रपूर शहरातील १५ वर्षापर्यंतच्या शाळा वा शाळेबाहेरील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याच्या नियोजनात सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापौर अंजली घोटेकर यांनी केले आहे.३० ते ३१ आॅगस्ट या कालावधीत मनपाच्या आरोग्य विभागाने शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी पर्यवेक्षक तसेच शहरातील स्वयंसेवी संस्था व धर्मगुरु यांच्याकरिता विविध कार्यशाळांचे आयोजन केले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महापौर घोटेकर म्हणाल्या, गोवर रुबेला ही लस ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील मुला मुलींना द्यावयाची असल्याने यात पालकांचा सहभाग महत्वाचा असणार आहे. त्यामुळे बालकांच्या आधी पालकांना समजाविणे आवश्यक आहे. शाळांमध्ये शिक्षक-पालक बैठकींद्वारे आपण पालकांना योग्य मार्गदर्शन करू शकतो. आजही सुई किंवा इंजेक्शनच्या नावाची भीती काही पालकांना आहे. शाळेत वापरली जाणारी सुई चांगली नसते, किंवा वारंवार वापरली जाते, असा गैरसमज काहींच्या मनात असतो. ही भीती त्यांच्या मनातून काढण्यास, तसेच शाळेबाहेरील मुले जी झोपडपट्टी भागातील असू शकतात अशा ठिकाणी स्वयंसेवी संस्थांची बरीच मदत होते कारण त्यांनी अश्या जागी कार्य केलेले असते. शहरातील सामाजिक संस्था समाजात राहून समाजासाठी कार्य करतात. गोवर रुबेला लस ही उजव्या दंडावर इंजेक्शनद्वारे दिली जाते. आज लसीकरणाची माहिती व महत्व हे सगळ्यांनाच समजल्याने काम काही अंशी सोपे झाले आहे. मनपाचा आरोग्य विभागाने लसीकरण सुरु होण्याच्या तीन महिने आधी आपण जनजागृती सुरु केली असल्याने त्याचा मोठ्या फायदा होत असल्याचे त्या म्हणाल्या.यावेळी मनपा आयुक्त संजय काकडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला डॉ. जयश्री वाडे, डॉ. विजया खेरा, डॉ. नरेंद्र जनबंधू, ग्रेस निठूरी, गणेश राखुंडे उपस्थित होते.
गोवर रुबेला लसीकरणासाठी सहकार्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2018 9:42 PM
संपूर्ण भारतातून मिजल्स (गोवर) आणि रुबेला आजाराचे उच्चाटन करण्याची केंद्र व राज्य सरकारची भूमिका आहे. १०० टक्के लसीकरण करणे हेच आपले अंतिम ध्येय असल्यामुळे चंद्रपूर शहरातील १५ वर्षापर्यंतच्या शाळा वा शाळेबाहेरील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याच्या नियोजनात सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापौर अंजली घोटेकर यांनी केले आहे.
ठळक मुद्देअंजली घोटेकर : मनपातर्फे चंद्रपुरात कार्यशाळा