शहरं
Join us  
Trending Stories
1
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
2
शेकडोंचा जमाव, घोषणाबाजी, दगड-विटांचा मारा, बांगलादेशात तीन मंदिरांची तोडफोड
3
"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार
4
विधानसभेच्या मतदानाआधीच काँग्रेसला लागली होती पराभवाची कुणकूण? तो अंतर्गत सर्व्हे चर्चेत
5
स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार न बनणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय; शरद पवारांची टीका
6
तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि...
7
वर्षभरात दिलाय ३३ टक्क्यांपर्यंत रिटर्न, कोणत्या Mutual Fund नं दिले बेस्ट रिटर्न्स, कोणती आहेत सेक्टर्स?
8
स्वप्नील जोशीने दिली 'मुंबई पुणे मुंबई ४' ची हिंट? मुक्ता बर्वेला टॅग करत म्हणाला...
9
Kalki Koechlin : "मी पैशासाठी अनेक गोष्टी..."; २ वर्षे काम नाही; वडापाव खाऊन अभिनेत्रीने काढले दिवस
10
"१०४ वर्षांचा झालोय, मला आता सोडा"; हत्या प्रकरणातील दोषीच्या याचिकेवर कोर्टाने दिला निर्णय
11
अरे बापरे! "कशाला लाज वाटायची?" म्हणत २४ वर्षीय मुलीने ५० वर्षांच्या वडिलांशी केलं लग्न
12
किंग कोहली अन् रुटपेक्षाही फास्टर ठरला Kane Williamson; जाणून घ्या त्याचा खास रेकॉर्ड
13
"आमच्याकडे हिंदू सुरक्षित, भारतातच अल्पसंख्यांकावर..."; बांगलादेशने प्रत्युत्तर देताना लावले आरोप
14
इथे शिव्या देण्यास मनाई आहे! महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीने केला अनोखा ठराव, दंडही ठरवला!
15
विराट कोहलीच्या आवडत्या कंपनीची कमाल, एका झटक्यात कमावले ८३८ कोटी रुपये
16
मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगली, भाजप धक्कातंत्र वापरणार?; मोहोळांनी स्वत: खुलासा करत संपवला सस्पेन्स 
17
एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर
18
'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेनं लग्नात हिंदीमध्ये घेतला हटके उखाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
December Born Astro: डिसेंबरमधले लोक असतात आळशी, हट्टी, तरी व्यक्तिमत्त्वाची छाप पाडण्यात होतात यशस्वी!
20
INDU19 vs PAKU19 : भारताविरुद्धच्या हायहोल्टेज सामन्यात टॉस जिंकून पाक संघानं घेतली बॅटिंग

गोवारी समाजाचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:22 AM

गोवारी ही जमात आहे. अनुसूचित जमातीच्या यादीत नोंद आहे. मात्र चुकीने गोंडगोवारी बनविण्यात आले. शासकीय योजनांपासून दूर ठेवले आहे. मात्र, आता आम्हाला गोंडगोवारी नको तर गोवारी म्हणून नोंद करून उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा, .....

ठळक मुद्देन्यायालयीन निर्णय लागू करा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गोवारी ही जमात आहे. अनुसूचित जमातीच्या यादीत नोंद आहे. मात्र चुकीने गोंडगोवारी बनविण्यात आले. शासकीय योजनांपासून दूर ठेवले आहे. मात्र, आता आम्हाला गोंडगोवारी नको तर गोवारी म्हणून नोंद करून उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा, या मागणीसाठी जिल्ह्यातील गोवारी समाजाने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.अनुसूचित जमातीच्या यादीत १९५६ मध्ये गोवारी ही स्वतंत्र जमात म्हणून नोंद करण्यात आली आहे. यादी तयार करताना ‘गोवारी ’असा उल्लेख न करता गोंडगोवारी करण्यात आला. शासनाच्या चुकीमुळे या जमातीला अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित रहावे लागत आहे. यासदंर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गोंडगोवारी असे नमूद करून शासकीय सवलतींचा लाभ देण्याच निर्देश दिले होते. मात्र, शासनाने अद्याप दखल घेतली नाही. त्यामुळे गोवारी समाजाने लोकशाही मार्गाने लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी गोवारी जमात संघटन समन्वय समितीच्या पुढाकारातून दर्गा मैदानावरून मोर्चा काढण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गाने निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले.जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शासनाने समाजाच्या मागणीची दखल घेऊन न्याय देण्याची मागणी वासूदेव ठाकरे, व्ही. डी. शेंदरे, जीवन दुधकोहरे, अरूण राऊत, भास्कर राऊ त, नंदकिशोर दरवरे, हरिचंद्र नेवारे, सुधीर राऊ त, देवराव गजभे, देवेंद्र चामलोट, सुनिल सहारे आदींनी केली.

टॅग्स :Morchaमोर्चा