लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा बांधकाम विभागात बांधकाम विषयक कामे प्रलंबित राहु नये, सर्व कामांमध्ये सुसुत्रता राहावी, याकरिता पीएमएस म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम ही प्रणाली लागू करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले होते. चंद्रपूर जिल्हा परिषदेकडून या प्रणालीनुसार कामकाज सुरू केल्या जाणार असून प्रलंबित कामांचा निपटारा होणार आहे. विशेष म्हणजे, या नवीन पद्धतीनुसार आता बांधकाम मोजमाप पुस्तिकेच्या प्रत्येक पानावर कार्यकारी अभियंत्यांना डिजीटल स्वाक्षरी करावी लागणार आहे.जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कामांंच्या संदर्भातील माहिती प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीमवरून प्रिंट काढून मोजमाप पुस्तिकेला चिकटवल्या जाते. यातून माहितीमध्ये विसंगती निर्माण होण्याचे प्रकार घडत होते. एकाच कामाबाबतची माहिती अन्यत्र वेगळ्या स्वरूपात नोंदविल्या जात असे. नवीन जीपीएस प्रणालीनुसार हा प्रकार आता बंद होणार आहे. त्याऐवजी सदरहू प्रिंट शाखा अभियंता, उपअभियंता तसेच कार्यकारी अभियंत्यांनी मोजमापांची अंतिम तपासणी केल्यानंतर विभागीय स्तरावर काढण्यात येणार आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीमध्ये कोणत्या अभियंत्यांने हा डेटा सिस्टमध्ये भरला आहे. त्याची ओळख सिस्टीममधून उपलब्ध होणार आहे. सदर प्रिंट आऊटलाच संगणकीय मोजमाप पुस्तिकेचा दर्जा देऊ न सदर प्रिंटआऊटवर प्रणालीमार्फत जो पीएमएस नंबर असेल त्यालाच एमबी नंबर (मोजमाप पुस्तिका क्रमांक) संबोधण्यात यावे, असेही सूचविण्यात आले. त्याची अंमलबजावणी जि. प. मध्ये केली जात आहे. प्रत्येक पानावर शाखा अभियंता व उपअभियंत्यांची डीजीटल स्वाक्षरी असावी. तसेच कार्यकारी अभियंता यांची डिजीटल स्वाक्षरी असलेली प्रत अंतीम मानन्यात यावी. सदर प्रिंटआऊट एकत्रितपणे स्टॅपल करून मुळ नस्तीला जोडण्यात येऊन कायम स्वरूपी जतन केल्या जात आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद लेखा संहिता १९६८ च्या नियमातील तरतुदीनुसारच अंमल केल्या जात असल्याची माहिती सूत्राने दिली.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरजिल्हा परिषदेच्या विविध विभागात मागील तीन वर्षांच्या कालखंडात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे प्रमाण वाढले. सुरूवातीला काही कर्मचाऱ्यांमध्ये हे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची मानसिकता नव्हती. परंतु, काळानुसार अद्ययावत राहणे हे सेवाशर्थीचा भाग ठरविल्याने ज्येष्ठ कर्मचाऱ्यांनीही संगणकाचा वापर करण्यावर भर दिला. त्यामुळे विभाग प्रमुखांना विविध विभागांमध्ये समन्वय ठेवण्यातील अडचणी दूर होऊ लागल्या आहेत. आता बांधकाम विभागातील सर्व कामांमध्ये सुसुत्रता राहावी, याकरिता पीएमएस प्रणालीचा स्वीकार करण्याच्या सूचना ग्राम विकास विभागाने दिल्या. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.
जि.प. राबविणार पीएमएस प्रणाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 6:00 AM
जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कामांंच्या संदर्भातील माहिती प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीमवरून प्रिंट काढून मोजमाप पुस्तिकेला चिकटवल्या जाते. यातून माहितीमध्ये विसंगती निर्माण होण्याचे प्रकार घडत होते. एकाच कामाबाबतची माहिती अन्यत्र वेगळ्या स्वरूपात नोंदविल्या जात असे. नवीन जीपीएस प्रणालीनुसार हा प्रकार आता बंद होणार आहे.
ठळक मुद्देबांधकाम विभागात सुसूत्रता : अभियंत्यांना करावी लागणार डिजिटल स्वाक्षरी