शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
3
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
5
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
6
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
7
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
8
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
9
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
10
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
11
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
12
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
13
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
14
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
15
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
16
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
17
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
18
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
19
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
20
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!

कर्जमाफीच्या जाचक अटींच्या जीआरची होळी

By admin | Published: June 23, 2017 12:37 AM

शेतकरी कर्जमाफीसंदर्भात सरकारने लावलेल्या चुकीच्या शासन निर्णयाच्या निषेधार्थ किसान क्रांती मोर्चा समन्वय समिती

निवेदन सादर : किसान क्रांती मोर्चा व विविध संघटनालोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : शेतकरी कर्जमाफीसंदर्भात सरकारने लावलेल्या चुकीच्या शासन निर्णयाच्या निषेधार्थ किसान क्रांती मोर्चा समन्वय समिती व विविध सामाजिक संघटना ब्रह्मपुरी यांच्या वतीने तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर शासन निर्णयाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या आदी मागण्यासाठी किसान क्रांती मोर्चा समन्वय समिती व सामाजिक संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ब्रह्मपुरीचे नायब तहसीलदार संजय पुंडेकर यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले. किसान क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या वतीने राज्यभर शेतकऱ्यांकरिता स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू व्हाव्यात, सरसकट कर्जमाफी व्हावी यासाठी आंदोलन छेडण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल शासनाने घेत तत्वत: कर्जमाफी देण्यासाठी जाचक अटी असलेल्या शासन निर्णय जारी केला आहे. या अटींनुसार, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणे कठीण आहे. या जाचक अटी शेतकऱ्यासाठी मारक असल्यामुळे त्याविरोधात किसान क्रांती मोर्चा समन्वय समितीने आवाज उठवून राज्यभर या शासन निर्णयाची होळी करण्याचे आवाहन करण्यात आले. त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ब्रह्मपुरी येथे किसान क्रांती मोर्चा समन्वय समिती व विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना मारक असलेल्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली.यावेळी विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. शिष्टमंडळात कॉ. विनोद झोडगे, महेश पिलारे, मोंटू पिलारे, अतुल राऊत, प्रा. अंकुश मातोरे, प्रा. अमृत नखाते, जि.प. सदस्य प्राचार्य राजेश कांबळे, माजी नगरसेवक विलास विखार, सुधीर पिलारे, वामन मिसार, डॉ. प्रेमलाल मेश्राम, रवी पवार, शामराव भानारकर, विनायक रामटेके, छोटू धोंगडे आदी उपस्थित होते.