नागभीड : येथील गो.वा.महाविद्यालयात पदवीदान समारंभ झाला.
प्राचार्य डॉ.संजय सिंग हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी, तर ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथील प्राचार्य डॉ.अमीर धम्मानी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्देशून प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ.अमीर धम्मानी यांनी समयोचित मार्गदर्शन केले. आजचे युग हे स्पर्धेचे युग असून, निर्माण झालेल्या समस्यांवर मात करावयाची असेल, तर विद्यार्थ्यांनी स्वत:ला सक्षम बनविणे आवश्यक आहे, असा सल्ला त्यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय सिंग यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना उपयोगी पडावीत, अशी माहिती दिली. सामाजिक बांधिलकीचा वसा विद्यार्थ्यांनी पत्करावा, असेही ते आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले. याप्रसंगी पदवी व पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथीच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन सांस्कृतिक विभागाचे समन्वयक डॉ.अशोक बहादुरे यांनी केले.