लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा: नाफेडने मागील वर्षात चना व तूर खरेदी केली. त्याचे चुकारे शेतीच्या हंगामात वापरता आले नाही. त्यामुळे यावर्षी नाफेडने खरेदी केलेल्या तुरी व चनाचे चुकारे जून महिन्यात देण्यात येणार आहे, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजीव गांधी मार्केट यार्ड मध्ये नाफेडच्या वतीने हमी भावात तूर व चना खरेदी सुरु आहे. या केंद्राची पाहणी करण्याकरिता ना. अहीर शहरात आले होते. शेतकऱ्यांनी यंदा चन्याचे अधिक प्रमाणात उत्पन्न घेतले. परंतु शासनाने एकरी चार क्विंटल चना खरेदी करण्याचे परिपत्रक काढले. तूर खरेदीची मुदत १५ मेपर्यंत असून अद्याप १३०० शेतकरी विक्रीच्या प्रतिक्षेत असल्याची बाब ना. अहीर यांच्या निदर्शनात आणून देण्यात आली.चना खरेदी संथ गतीने सुरु आहे. तुरीचे चुकारेही मिळाले नाही, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली. ना. अहीर यांनी प्रलंबित सोडविण्याकरिता शासन दरबारी पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. यावेळी पणन महासंघाचे अधिकारी व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.बाजार समितीमध्ये शेतमालाची आवकवरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, चिमूर तसेच यवतमाळ जिल्ह्यातील वणी मारेगाव तालुक्यातील शेतकरी शेतमाल विक्रीकरिता येत आहेत. त्यामुळे वरोरा बाजार समितीची आवक वाढली. केंद्रीय राज्यमंत्री अहीर यांनी बाजार समितीमधील सुविधांची माहिती सभापती विशाल बदखल यांच्याकडून जाणून घेतली.यावेळी बाजार समितीचे उपसभापती राजू चिकटे, जि.प. सभापती अर्चना जिवतोडे, नगराध्यक्ष अहेतेशाम अली, नगरसेवक बाबा भागडे, डॉ. भगवान गायकवाड, बाजार समिती संचालक संजय घागी, देवानंद मोरे, नरेंद्र जिवतोडे, विजय राऊत, अंकुश आगलावे, महादेव जिवतोडे, सुरेश महाजन, बाजार समिती सचिव शिंदे आदी उपस्थित होते.
चना, तुरीचे प्रलंबित चुकारे जून महिन्यात मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 11:27 PM
नाफेडने मागील वर्षात चना व तूर खरेदी केली. त्याचे चुकारे शेतीच्या हंगामात वापरता आले नाही. त्यामुळे यावर्षी नाफेडने खरेदी केलेल्या तुरी व चनाचे चुकारे जून महिन्यात देण्यात येणार आहे, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.
ठळक मुद्देहंसराज अहीर : शेतकऱ्यांच्या भेटीप्रसंगी दिली ग्वाही