बँकेच्या खात्यामध्ये मोबाईल नंबर लिंक असल्यामुळे लाभार्थी यांना मोबाईलवर मेसेज आला. त्यामुळे बँक खाते चेक करून काही लोकांनी खावटी अनुदानाची मिळालेली रक्कम काढून घेतली आहे. त्यामुळेच आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. कोरोनाकाळात आदिवासी जनतेची आर्थिक परिस्थिती डबघाईस आलेली असताना अशा हलाखीच्या परिस्थितीवर मात करून त्या लोकांचे आर्थिक स्थैर्य उंचवावे, या उदात्त हेतूने शासनाने रोजगार हमी योजनेचे मजूर, विधवा महिला, दिव्यांग, भूमिहीन, शेतमजूर इत्यादी दुर्बल घटकांतील लोकांना जीवनावश्यक वस्तू व दोन हजार रुपये रोख रक्कम देण्यात येत आहे, ही अनुदानित योजना आदिवासी प्रकल्प कार्यालय व आदिवासी विकास महामंडळ यांच्या मार्फत राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोनाच्या काळात शासकीय पोस्ट बेसिक आदिवासी आश्रम शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांनी दिवसरात्र परिश्रम घेऊन आदिवासी बांधवांना खावटी अनुदान मिळावे म्हणून अर्ज गोळा करून शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे काम केल्याचे हे फलित आहे.
खावटी योजनेचे अनुदान आदिवासी बांधवांच्या खात्यात जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 4:26 AM