जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २५ हजार ५१८ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २३ हजार ९७२ झाली आहे. सध्या एक हजार १२८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. दोन लाख ४७ हजार २०४ नमुन्यांची तपासणी झाली. त्यापैकी दोन लाख १७ हजार २५९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपुरातील सिस्टर कॉलनी येथील ६० वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४०८ बाधितांचे मृत्यू झाले यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३६९, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
चंद्रपुरात ६५ पॉझिटिव्ह
आज बाधित आढळलेल्या १२६ रूग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील ६५, चंद्रपूर तालुका १६, बल्लारपूर चार, भद्रावती आठ, ब्रह्मपुरी सात, सिंदेवाही आठ, राजुरा दोन, चिमूर एक, वरोरा १०, कोरपना एक, जिवती दोन व इतर ठिकाणच्या दोन रूग्णांचा समावेश आहे.
आरटीपीआर ८० तर अॅन्टिजेन चाचणीत ४६ डिटेक्ट
मागील २४ तासात एक हजार ९९२ आरटीपीसीआर व एक हजार ६४५ अॅन्टिजेन चाचण्यात करण्यात आल्या. त्यामध्ये अनुक्रमे ८० व ४६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. जिल्ह्यात आयएलआय (८२) व सारीचे (५६) रूग्ण वाढत आहेत. सद्यस्थितीत ५ हजार ७६ बाधित गृह विलगीकरणात आहेत.
३ हजार ६६९ चाचण्यांच्या अहवालाची प्रतीक्षा
जिल्ह्यात शनिवारपर्यंत तपासण्यात आलेल्या चाचण्यांपैकी ३ हजार ६६९ चाचण्यांचा अहवाल वेटींगवर आहे. ७५८ चाचण्यांचा अहवाल प्रलंबित ठेवण्यात आला. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, कोरोना बाधित होण्याचा आजचा रेट ४. ३४ टक्के नोंदविण्यात आला आहे.