लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : कृषिपंपांना २४ तास वीज पुरवठा देण्यात यावा, या मागणीसाठी तालुक्यातील शेतकºयांनी वरोरा येथील वीज वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयासमोर गळफास आंदोलन केले.सोयाबीनचे पीक निघाले असल्याने चना, गहू, पिकांकरिता शेतजमिनी तयार करण्याचे काम शेतात सुरू आहे. काही शेतकºयांची चना व गव्हाची पेरणी झाल्याने त्या पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. तसेच वातावरण उष्ण असल्याने कपाशीच्या पिकांना पाणी पाहिजे. असे असताना कृषिपंपाला आठवड्यातून तीन दिवस रात्री तर चार दिवस दिवसा थ्री फेज वीज पुरवठा देण्यात येत आहे.दिवसा मिळणारा थ्री फेज वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे टेमुर्डा, पांढरतळा, मांगली, पिंपळगाव, बोरगाव आदी गावातील शेतकºयांनी राष्टÑवादी कॉंग्रेस ओबीसी सेल चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष नितीन मत्ते यांच्या नेतृत्वात वरोरा येथील वीज वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयासमोर गळफास आंदोलन केले. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत उठणार नाही व गळफास घेऊ, अशी भूमिका घेतल्याने घटनास्थळावर पोलिसांना पाचारण करण्यात आले. वीज वितरण कंपनीच्या वरोरा विभागीय कार्यालयाने तातडीने प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला. त्यात रात्रीच्या वीज पुरवण्यात बदल करून रात्री दोन ते सकाळी १० वाजेपर्यंत थ्री फेज लाईन देण्याची मागणी मान्य झाल्याने पाच तासांपासून सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले.
शेतकऱ्यांचे गळफास आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:18 AM