शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

वेळेत घरकुल बांधणाऱ्या लाभार्थ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 4:33 AM

नागभीड : महाआवास योजनेंतर्गत ११ नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत उत्कृष्ट काम करणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांना पुरस्कार ...

नागभीड : महाआवास योजनेंतर्गत ११ नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत उत्कृष्ट काम करणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पंचायत समिती नागभीडच्या सभागृहात मंगळवारी हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार कीर्तीकुमार भांगडिया, जि. प. सदस्य संजय गजपुरे, नगराध्यक्ष उमाजी हिरे, उपसभापती रागिणी गुरुपुडे, पंचायत समिती सदस्य संतोष रडके, सुषमा खामदेवे, प्रभारी गटविकास अधिकारी संजय पुरी, न. प.चे उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, कृउबासचे सभापती अवेश पठाण, सरपंच संघटनेचे अध्यक्ष कमलाकर ठवरे यांची उपस्थिती होती. यावेळी केंद्र पुरस्कृत योजनेत नवेगाव पांडवचे यशवंत नखाते, वासाळा मेंढाचे रामेश्वर गायकवाड, मांगलीचे वामन नवघडे यांच्यासह कोजबी माल, नवेगाव हुंडेश्वरी, येनोली माल या ग्रामपंचायतींना, तर राज्य पुरस्कृत योजनेत मिंडाळ्याचे मोहन चौधरी, बाळापूर खुर्दचे शिलवंत सोनटक्के, खडकीचे अरविंद नैताम यांच्यासह उश्राळ मेंढा, आलेवाही, किरमिटी मेंढा या ग्रामपंचायतींना सन्मानित करण्यात आले. संचालन विस्तार अधिकारी आर. डी. धुर्वे, तर आभार विस्तार अधिकारी श्वेता राऊत यांनी मानले. तालुका समन्वयक हिरा गजभिये, गृहनिर्माण अभियंता शुभम भडके, डॉटा ऑपरेटर राजू बावणे यांची यावेळी उपस्थिती होती.

240821\1651-img-20210824-wa0046.jpg

सत्कार करतांना आमदार भांगडिया , गटविकास अधिकारी संजय पुरी