चंद्रपूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० वा जयंती दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष नगरसेवक स्नेहल देवानंद रामटेके यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मालार्पण करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव बघता जिल्हा प्रशासनाकडून कार्यक्रम घेण्यास बंदी असल्याने कोणतेही प्रबोधनात्मक कार्यक्रम न घेता मानवंदना घेऊन सांगता करण्यात आली. यावेळी आंबेडकरी नेते कोमल खोब्रागडे, देशक खोब्रागडे, सुरेश नन्नावरे, तथागत पेटकर, सिद्धार्थ वाघमारे, जितेंद्र डोहणे, प्रशांत रामटेके, सुरेंद्र रायपुरे, राकेश वाघमारे, गुड्डूभाऊ मेश्राम, सारंग साखरे मिथुन कातकर आदी उपस्थित होते.
-------
जयभीम वाचनालयात महामानवाला अभिवादन
फोटो
सावली : येथील जयभीम वाचनालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला. निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण वाचनालयाच्या अध्यक्ष लता लाकडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर बुद्ध वंदनेचे पठन करण्यात आले. कार्यक्रमाला वाचनालयाच्या उपाध्यक्ष सुनीता बोरकर, सचिव जी. एम. भडके, सेवानिवृत्त मुख्याध्यापक ए. आर. दुधे, माजी अध्यक्ष अरविंद गेडाम, नानाजी बोरकर, हेमलता गेडाम, संदीप गेडाम उपस्थित होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संचालन वाचनालयाचे ग्रंथपाल डिलक्स डोहणे तर आभार प्रद्युत डोहणे यांनी मानले.
फोटो