लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपुरातील महापौर चषकातील प्रोटोकालचा वाद आता चव्हाट्यावर आला आहे. खुद्द पालकमंत्रीच याबाबत गंभीर आहेत. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत कुठलाही राजशिष्टाचार पाळण्यात आला नाही. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना नाव टाकण्यासंदर्भात विचारणाही करण्यात आली नाही. राजशिष्टाचाराची अवहेलना करण्यात आल्यामुळे पाकलमंत्र्यांनी महापौर राखी कंचर्लावार यांच्याविरोधात पोलिसात तक्रार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले आहे.चंद्रपूर शहर महापालिकेने महापौर चषक २०२० चे आयोजन केले आहे. शनिवारी या चषकाला सुरुवात होणार आहे. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत प्रोटोकाल पाळण्यात आला नसल्याचा आरोप होत आहे. उद्घाटनाचा मान पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा असताना त्यांना देण्यात आलेला नाही. त्यामुळे संतापलेल्या पालकमंत्र्यांनी थेट महापौरांवर एफआयआर दाखल करण्याची भूमिका घेतली आहे. या संदर्भात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पत्र देऊन तक्रार केली आहे.जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी या संदर्भात मनपा आयुक्त संजय काकडे यांच्याकडून लिखित स्वरुपात उत्तर मागितले आहे.या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या संपर्क साधला असता ते म्हणाले, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून लिखित तक्रार मिळाली आहे. यात महापौर चषकाच्या निमंत्रण पत्रिकेत त्यांना न विचारता त्यांचे नाव टाकण्यात आले आहे.सोबत राजशिष्टाचारनुसार नाव टाकण्यात आले नसल्याचीही तक्रार केली आहे. या संदर्भात कारवाई करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी पत्रात दिले आहेत.अधिकारी दोषी असेल तर कारवाईचे प्रावधानयानंतर जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांनी मनपा आयुक्त संजय काकडे यांच्याकडून लिखित स्पष्टीकरण मागितले आहे. त्यांचे स्पष्टीकरण मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. जिल्हाधिकारी खेमनार यांनी सांगितले की यात अधिकाऱ्यांची चुक समोर आली तर त्यांची विभागीय चौकशी व कारवाई होऊ शकते. या संदर्भात दोन शासकीय आदेशाचा अभ्यास केला. मात्र कुठेही पदाधिकाºयांची चुक असेल तर कारवाईचे प्रावधान नसल्याचे खेमनार यांनी सांगितले. पदाधिकाºयांना केवळ त्यांची चुक लक्षात आणून देण्याची तरतूद आहे.आयुक्तांकडून राजशिष्टाचाराचे पालनमनपा आयुक्त संजय काकडे यांनी राजशिष्टाचारनुसारच महापौर चषकाची निमंत्रण पत्रिका तयार केली होती. मात्र महापौरांनी आपल्या मताने निर्णय घेत सदर पत्रिका प्रकाशित केली. याबाबत आयुक्तांनी महापौरांना पत्रही दिले आहे.पालकमंत्र्यांना असतो उद्घाटनाचा मानराजशिष्टाचारानुसार पालकमंत्री यांच्यापेक्षा कोणी मोठी व्यक्ती कार्यक्रमात नसेल तर पालकमंत्र्यांनाच उद्घाटनाचा मान असतो. किंवा अध्यक्षस्थानी त्यांचे नाव असणे आवश्यक आहे, अशी माहिती ते जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांनी शुक्रवारीच एक आदेश निर्गमित करून सर्व शासकीय कार्यक्रमात निमंत्रण पत्रिकेत राजशिष्टाचाराचे पालन करण्याविषयी तंबी दिली असल्याचे सांगितले.राजशिष्टाचाराचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करा - जोरगेवारचंद्रपूर : मनपाच्या वतीने आयोजित महापौर चषक २०२० च्या निमंत्रण पत्रिकेवर मान्यवरांचे नाव टाकताना राजशिष्टाचाराचे पालन करण्यात आलेले नाही. पालकमंत्री, खासदार, आणि स्थानिक आमदारांना यात नियमानुसार योग्य स्थान देण्यात आलेले नाही. तसेच ही पत्रिका छापताना कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही. हा राजशिष्टाचाराचा भंग असून या विरोधात संबधितांवर योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली असून याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले आहे.
महापौराविरोधात पालकमंत्री आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 6:00 AM
चंद्रपूर शहर महापालिकेने महापौर चषक २०२० चे आयोजन केले आहे. शनिवारी या चषकाला सुरुवात होणार आहे. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत प्रोटोकाल पाळण्यात आला नसल्याचा आरोप होत आहे. उद्घाटनाचा मान पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा असताना त्यांना देण्यात आलेला नाही. त्यामुळे संतापलेल्या पालकमंत्र्यांनी थेट महापौरांवर एफआयआर दाखल करण्याची भूमिका घेतली आहे.
ठळक मुद्देमहापौर चषकात प्रोटोकॉलचा धिंगाणा : जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्तांना मागितले स्पष्टीकरण