सिंदेवाही : लिकर असोसिएशनच्या वतीने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्ह्याची दारूबंदी उठवण्याच्या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हावासीयांना दिलेला शब्द पाळला. वडेट्टीवारमंत्री झाल्यानंतर जिल्ह्याच्या पहिल्याच दौऱ्यात दारूबंदी उठवणार असे संकेत दिले होते. जिल्ह्याची गुन्हेगारी कमी करण्यासाठी दारूबंदी उठवावी, यासाठी आग्रह धरला होता. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याची दारूबंदी उठवण्याचा निर्णय झाला आणि जिल्ह्यातील लिकर असोसिएशनमध्ये आनंदाची लाट पसरली. शनिवारी सिंदेवाही दौऱ्यावर पालकमंत्री वडेट्टीवार आले असताना लिकर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी व्यंकटेश बालसनिवार, विलास नेरकर, भालचंद आडवाणी, नोटू भाटिया, संजय रणदिवे, संदीप चौरसिया, सुधीर मिश्रा, अनुप पोरेड्डीवार, गणेश गोलपल्लीवार, सुनील उत्तरवार, दिनेश गावंडे, चंदू जयस्वाल उपस्थित होते.