लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्याचे मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणी विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिन विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात पालकमंत्री कार्यालयाचे शुक्रवारी उद्घाटन पार पडले.यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, विविध विभागांचे प्रमुख व स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दालनाचे उद्घाटन केल्यानंतर पालकमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या दालनाची पाहणी करून संबंधित अधिकाºयांशी चर्चा केली. त्यानंतर नियोजन भवनात सर्वविभाग प्रमुखांची बैठक घेतली. बैठकीचे संचालन जिल्हा नियोजन अधिकारी ग. रू. वायाळ यांनी केले. जिल्हा प्रशासनात कार्य करणाºया प्रत्येक विभाग प्रमुखाच्या कामकाजाची पालकमंत्री वडेट्टीवार यांनी माहिती घेतली. २० जानेवारी २०२० रोजी विभागनिहाय आढावा आणि २५ जानेवारी रोजी जिल्हा नियोजन विभागाची बैठक होणार आहे.५९ हजार बँकखाते आधारकार्ड संलग्नजिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ चे सादरीकरण यावेळी केले. सदर योजनेतंर्गत जिल्ह्यात ९० टक्के शेतकºयांनी आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न केले. जिल्ह्यात ६० हजार ८०० पात्र बँकखाते आहेत. त्यापैकी ५९ हजार खात्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न झाले. फेब्रुवारी महिन्यापर्यंत सर्व शेतकºयांची नोंदणी व खात्याची तपासणी पूर्ण होणार असल्याची माहितीही पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे सादर केली.धनगर समाजाने योजनांचा लाभ घ्यावाधनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणात मागे राहू नये, यासाठी इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी राज्य सरकारने योजना तयार केली आहे. भटक्या समाजाला स्थिरता मिळावी, यासाठी ग्रामीण भागात घरकुल योजना राबविण्यात येत आहे. या दोन्ही योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री वडेट्टीवार यांनी धनगर समाज शिष्टमंडळाला केले.
पालकमंत्री कार्यालय जनसेवेत रूजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 6:00 AM
यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, विविध विभागांचे प्रमुख व स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दालनाचे उद्घाटन केल्यानंतर पालकमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या दालनाची पाहणी करून संबंधित अधिकाºयांशी चर्चा केली. त्यानंतर नियोजन भवनात सर्वविभाग प्रमुखांची बैठक घेतली.
ठळक मुद्देविकासाला गती : विजय वडेट्टीवार यांचा अधिकाऱ्यांशी संवाद