याबाबत मानोरा येथील ग्रामपंचायत सभागृहात कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात तहसीलदार संजय राईंचवार, सेव्ह फॉरेस्ट सेव्हचे पुरुषोत्तम पोटे, सतीश नाईक, मानोरा ग्रामपंचायतीच्या सरपंच जीवनकला ढोंगे, उपसरपंच लहुजी टिकले, तलाठी महादेव कन्नाके, कोडापे व इतर सदस्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात ई-पीक पाहणी ॲप कसा हाताळायचा, यावर तहसीलदार संजय राईंचवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, या ॲपवर माहिती भरणे अगदी सोपे आहे. ॲप डाऊनलोड करून पिकाचा हंगाम, पिकाचा वर्ग, पिकाचे नाव क्षेत्र, जलसिंचनाचे साधन, पीक लागवडीचा दिनांक, मुख्य पिकाचे छायाचित्र व इतर बाबी सबमिट केले की, झाली पीक पाहणी. प्रत्येक शेतकऱ्यांनी हे करून पाहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. याशिवाय उपसरपंच लहुजी टिकले यांनी ई-पीक पाहणी ॲपवर येणाऱ्या अडचणी सांगितल्या. पुरुषोत्तम पोटे यांनी वन्य जीव संरक्षण अभियानांतर्गत वनात राहणाऱ्या वन्य प्राण्यांसोबत परिसरातील नागरिकांनी संघर्ष टाळण्यासाठी माहिती सांगितली व शासनाच्या विविध योजनांवर मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामसचिव प्रवीण घुले, लिपिक करण गेडाम, सेव्ह फॉरेस्ट सेव्हचे विक्रांत पंडित, रामदास दुर्योधन, सुनील वाडगुरे, आकाश नन्नावरे, सुनील कोहरे उपस्थित होते.
260921\manora...jpg
मार्गदर्शन करतांना तहसीलदार संजय राईंचवार