चिमूर : स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात इतिहास विषयासंबधी ऑनलाईन मार्गदर्शनक कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य कार्तीक पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रा.डॉ. बन्सोड, तर मार्गदर्शक म्हणून वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. बी. आर. मस्के, बडनेरा येथील नारायण राणा महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख व संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे इतिहास मंडळाचे अध्यक्ष प्रा डॉ. संतोष बन्सोड, डॉ. कुसुमेंद्र सोनटक्के, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. गजभिये, डॉ. कात्रोजवार, प्रा. वाघमारे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. मस्के यांनी विद्यार्थ्यांना इतिहास विषयाची गरज, इतिहासाचे भविष्यातील महत्व, याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. बन्सोड यांनी स्पर्धा परीक्षेत इतिहास विषयाचे महत्व याबाबत माहिती दिली. संचालन इतिहास विभाग प्रमुख प्रा. राजुरवाडे यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
चिमूर येथे विद्यार्थ्यांना इतिहास विषयाचे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 4:37 AM