स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धेत विविध पुरस्कारप्राप्त करणारी मूल नगर परिषद शहर स्वच्छतेत कुठेही मागे नाही. वेळोवेळी नाल्याची सफाई व कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. यामुळे विविध आजारांवर प्रतिबंंध घालणे शक्य झाले आहे. मात्र पावसाळ्याच्या दिवसात विशेष लक्ष देणे गरजेचे असते. मूल शहरात मोकाट डुकरांचा हैदोस जवळपास सर्वच वाॅर्डात वाढला असल्याचे दिसून येत आहे. वराह पालन करणाऱ्यांनी डुकरांना शहराबाहेर एका बंदिस्त ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. २४ तास डुकराचा कळप वार्डावार्डात फिरत असतो. मागील दोन वर्षात वराह पालन करणाऱ्या व्यक्तींना नोटीस व तंबी दिल्यानंतरही काहींनी त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी नगर परिषदेने डुकरे पकडण्याची मोहीम राबविली होती.
मूल शहरात डुकरांचा हैदोस, नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 4:29 AM