शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
2
मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा; विधानसभेवर पुन्हा महायुतीचा भगवाच फडकणार - CM शिंदे
3
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
4
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
5
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
6
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
7
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
8
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
9
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
10
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
11
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
12
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 
13
मागास, वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार; पंकजा मुंडे कडाडल्या; धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यास हजर
14
या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय
15
दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
16
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
17
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
18
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
19
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका

दिवसा हाहाकार, रात्री कोसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2022 5:00 AM

अप्पर वर्धा, गोसीखुर्द, इरई धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने वर्धा, वैनगंगा, इरई तसेच झरपट या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. परिणामी नदीपट्ट्यातील शेकडो घरांत पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांना घर सोडावे लागले. शेतीचेही मोठ्या  प्रमाणात नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत पावसाची संततधार तसेच धरणातील पाणी सोडले जात असल्याने जिल्ह्यात पूरपरिस्थिती आणखीनच बिकट होण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा जबर फटका जिल्ह्याला  बसला आहे. जिल्ह्यातील वर्धा, पैनगंगा, इरई, झरपट नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. बुधवारी सकाळपासून इरईचे धरणाचे सातही दरवाजे सव्वा मीटरने  उघडल्याने इरई नदीचे पाणी चंद्रपूर शहरातील काही भागात शिरले. परिणामी नागरिकांना घर सोडावे लागले. रात्री पावसाने वेग घेतल्याने नदीचे पाणी वाढत आहे. पूरपरिस्थिती बिकट होण्याची शक्यता वाढली आहे.  दरम्यान, जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.बल्लारपूर तालुक्यातील विसापूर-कोलगाव येथे वर्धा नदीच्या घाटावर पूल बांधण्यात येत आहे. या पुलाच्या कामावर असलेले सहा मजूर पुरात अडकल्याची माहिती मिळाली आहे.अप्पर वर्धा, गोसीखुर्द, इरई धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने वर्धा, वैनगंगा, इरई तसेच झरपट या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. परिणामी नदीपट्ट्यातील शेकडो घरांत पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांना घर सोडावे लागले. शेतीचेही मोठ्या  प्रमाणात नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत पावसाची संततधार तसेच धरणातील पाणी सोडले जात असल्याने जिल्ह्यात पूरपरिस्थिती आणखीनच बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.चंद्रपूर शहरातील काही काॅलनीमध्ये पुराचे पाणी शिरत असल्याने रहमतनगर, सिस्टर काॅलनीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.रहमत नगर परिसरात सकाळपासून पाणी शिरत होते. त्यामुळे नदीकाठच्या अनेक कुटुंबीयांना प्रशासनाने हलविले असून सुरक्षितस्थळी पोहोचविले आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका : प्रशासनकोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात प्रवेश करू नये. नदीपात्राच्या कडेला अथवा धोक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका. जुन्या मोडकळीस आलेल्या घरात, इमारतीत आश्रय घेऊ नका. पुलावरून नदी नाल्याचे पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका, अफवा पसरू नका. येथे करा संपर्क- घडलेल्या घटनेची आपत्तीची माहिती तत्काळ जिल्हा तसेच तालुका नियंत्रण कक्षाला द्यावी. - यासाठी चंद्रपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूरच्या ०७१७२-२५१५९७ या क्रमांकावर नियंत्रण कक्षात संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अजय गुल्हाने आणि निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार  मेश्राम यांनी केले आहे.

पावसामुळे जनजीवन विस्कळीत

या गावांना पुराचा वेढा- चंद्रपूर शहरातील सिस्टर काॅलनी, रहमतनगरसह, झरपट नदी परिसरासह बल्लारपूर तालुक्यातील चारगाव, हडस्ती, राजुरा तालुक्यातील कोलगाव तसेच सास्ती या गावांना पुराच्या पाण्याने वेढले आहे. 

बसफेऱ्या प्रभावितजिल्ह्यात आलेल्या पुराचा फटका एसटी महामंडळालाही बसला आहे. बुधवारी अनेक मार्गावरील बस फेऱ्या बंद करण्यात आल्या. त्यामुळे प्रवासी अडकले. विशेषत: राजुरा, गडचांदूर, कोरपना, जिवती या मार्गावरील बस बंद करण्यात आल्या.

वीजपुरवठा खंडितचंद्रपूर शहरातील रहमतनगर, सिस्टर काॅलनी परिसरामध्ये इरई नदीचे पाणी शिरत असल्यामुळे या परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पाणी चढत असल्याने नागरिकांनी घरातील साहित्य पॅकिंग करून घर सोडणेही सुरू केले.

या तालुक्याला   फटका अधिकजिल्ह्यात सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, चंद्रपूरसह राजुरा, कोरपना, भद्रावती,जिवती, पोंभूर्णा मूल या तालुक्यांना अधिक फटका बसला आहे. या तालुक्यात शेतीसह घरांचेही मोठे नुकसान झाले आहे.

सेल्फीसाठी  नागरिकांची गर्दीइरई नदी फुगली असून नदीचे पाणी अनेक काॅलनीमध्ये शिरत आहे. दरम्यान, इरई नदीच्या चंद्रपूर-दाताळा पुलावर नागरिकांनी बरीच गर्दी केली होती. अनेक जण मोठ्या प्रमाणात सेल्फी काढत असल्याने या पुलावर जत्रेचे स्वरुप आले होते.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर