लोकमत न्यूज नेटवर्कपोंभुर्णा: तालुक्यातील धानपीक गर्भाशयात आले आले असून लोंबे बाहेर पडत आहेत. मात्र रानडुकरे आणि अन्य वन्य प्राण्यांनी हैदोस सुरू केल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. काही शेतकºयांनी रात्रीची जागली करण्यासाठी कुत्र्यांचा आधार घेतल्याचे शेतशिवारात दिसून येत आहे.रामपूर, दीक्षित, थेरगाव, देवाडा खुर्द, डोंगरहळदी, जामतुकूम कोसंबी रिठ, उमरी पोतदार, विहिरगाव, घनोटी, बोर्डा आणि झुल्लूरवार या गावांत यंदा धान शेतीची स्थिती उत्तम आहे. सद्य:स्थितीत धानाचे लोंबे बाहेर येत असून उत्पन्न चांगले होईल, या आशेने शेतकरी शेतीची राखण करीत आहेत. परंतु, शेतशिवारामध्ये रानटी डुकरांचा कळप शिरकाव करुन गर्भाशयातील धानपिकांचे प्रचंड नुकसान करीत आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकºयांचे प्रचंड नुकसान होत आहे. शेतकºयांचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. सिंचनाची सोय नसल्याने केवळ निसर्गावर अवलंबून शेतीचे उत्पादन घ्याव ेलागते. यंदा पावसाने बरेच दिवस हुलकावणी दिल्याने धानपिक करपायच्या उंबरठ्यावर होते. मात्र, बºयापैकी पाऊस बरसल्याने धानपिकांना नवसंजीवनी मिळाली. गर्भात असलेल्या धान पिकांच्या कोंबी बाहेर पडायला सुरुवात झाली. पण, रानटी डुकरांच्या हैदोसामुळे नुकसानीचे संकट पुढे आले आहे.यावर्षी अगदी पिकाच्या पेरणी पासूनच शेतकºयांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. मशागतीनंतर धान पºह्यांची लागवड केल्यानंतर पावसाअभावी अनेक दिवस रोवणीची कामे खोळंबली होती. त्यानंतर काही दिवसांनी पावसाळा सुरुवात झाल्याने रोवणी पूर्ण होऊ शकली. परंतु पावसाने दडी मारल्याने धानपिक करपायला सुरुवात झाली. शेतकºयांसमोर उभे ठाकलेले हे नैसर्गिक संकट आणि डुकरांनी सुरू केलेला हेदोस पाहून शेतकरी हैराण झाला आहे. डुकरांचा धान पिकांपासून संरक्षण करण्यासाठी मचाणीवर जागल करुनही डुकरांचा बंदोबस्त होत नसल्याने देवाडा खुर्द येथील बंडू शंकर घोंगडे व भाऊ साईनाथ घोंगडे यांनी चक्क आपल्या शेतामध्ये चार पाळीव कुत्रे ठेऊन डुकरांवर पाळत ठेवत आहेत. या कुत्र्यांना रानटी डुकरे आल्याची चाहूल लागताच मोठ्याने भूकतात. त्यामुळे शेतशिवारात शिरकाव करीत नाही हा प्रयोग बघण्यासाठी बरेच शेतकरी त्यांच्या शेताला भेट दिल्याचे दिसून आले. अनेक शेतकºयांनी कर्ज काढून यंदा शेती केली. उत्पादन झाले तरच कर्जाचा भरणा करणे शक्य् होईल, असे वाटत असतानाच डुकरांनी त्रस्त केल्याने शेतकºयांची मोठी कोंडी झाल्याचे तालुक्यात दिसून येत आहे.तातडीने बंदोबस्त कराधानाच्या शेतात घुसून डुकरांनी हैदोस सुरू केल्याने प्रचंड नुकसान होत आहे. काही शेतकºयांना जागली सुरू केली. मात्र, डुकरांनी पिच्छा सोडला नाही. कर्ज काढून शेती करणाºया शेतकºयांमध्ये चिंता निर्माण झाली असून कर्ज भरण्याइतके उत्पन्न हाती येईल की नाही, या प्रश्नाने हतबल झाले आहेत. त्यामुळे वनविभागाने अन्य वन्यप्राणी आणि डुकरांचा तातडीने बंदोबस्त करावा. तसेच नुकसान झालेल्या शेतीचे सर्वेक्षण करून शासनाने भरपाई द्यावी. अन्यथा आंदोलन करू, असा इशारा शेतकºयांनी दिला आहे.
वन्यप्राण्यांचा धान पिकात हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:28 PM
तालुक्यातील धानपीक गर्भाशयात आले आले असून लोंबे बाहेर पडत आहेत. मात्र रानडुकरे आणि अन्य वन्य प्राण्यांनी हैदोस सुरू केल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.
ठळक मुद्देशेतकरी त्रस्त : धानपिकांचे नुकसान, रात्रीच्या जागलीसाठी कुत्र्यांचा आधार