लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : उज्ज्वला योजनेअंतर्गत जिल्ह्यात ७४ हजार १३७ गॅस कनेक्शन वितरित करण्यात आले आहे. जिल्ह्यात ४ लाख ९४ हजार ४८४ शिधापत्रिकाधारक आहेत. यातील तीन लाख ३२ हजार १३० कुटुंबे ही गॅसधारक आहेत. परंतु, १ लाख ६२ हजार ३५४ कुटुंबांना अद्याप सिलिंडरपासून वंचित आहेत.सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबासाठी उज्ज्वला योजना सुरू केली आहे. या योजनअंतर्गत अशा कुटुंबांना मोफत सिलिंडर दिल्या जाते. योजनेच्या लाभासाठी आतापर्यंत जिल्ह्यातून १ लाख १६२ कुटुंबांनी अर्ज सादर केले. यातील ८० हजार ५६८ कुटुंबांचे अर्ज मंजूर झाले असून १९ हजार ५९४ अर्ज नामंजूर करण्यात आले. एकूण अर्जांपैकी उज्ज्वला योजनेचे लाभार्थी म्हणून ७४ हजार १८५ कुटुंबांची निवड करण्यात आली. यातील ७४ हजार १३७ कुटुंबांना सिलिंडर देण्यात आला.४ हजार ४४७० कुटुंबांकडील गॅस जोडणी रद्द करण्यात आली आहे. जिल्ह्याची लोकसंख्या २१ लाख ९४ हजार २६२ आहे. यात ४ लाख ९४ हजार ४८४ कुटुंबांकडे शिधापत्रिका आहेत. यातील ३ लाख ३२ हजार १३० कुुटुबे गॅसधारक तर १ लाख ६२ हजार ३५४ कुटुंबांकडे गॅस नाही. जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने उज्ज्वला योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्याने लाभार्थ्यांची संख्या वाढत आहेत.परंतु ग्रामीण व आदिवासी भागातील शेकडो कुटुंबांपर्यंत ही योजना पोहोचली नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाज घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ही योजना गतिमान करण्याची मागणी विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी केली आहे.-अन्यथा पुन्हा चुलआर्थिकदृष्ट्या दुर्बल या निकषातून उज्ज्वला योजनेचे गॅस कनेक्शन मिळाले. मात्र, काही महिने लोटल्यानंतर सिलिंडर रिफिलींगसाठी लागणारे पैसे जुळविताना शेकडो कुटुंबांना संकटांचा सामना करावा लागत आहे. शासनाने यावर तोडगा काढला नाही तर गरीबांना चुलीचाच आधार घेण्याची वेळ येऊ शकते. योजना राबवताना याकडेही लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली.
दीड लाख कुटुंबांना सिलिंडरची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 11:52 PM
उज्ज्वला योजनेअंतर्गत जिल्ह्यात ७४ हजार १३७ गॅस कनेक्शन वितरित करण्यात आले आहे. जिल्ह्यात ४ लाख ९४ हजार ४८४ शिधापत्रिकाधारक आहेत. यातील तीन लाख ३२ हजार १३० कुटुंबे ही गॅसधारक आहेत. परंतु, १ लाख ६२ हजार ३५४ कुटुंबांना अद्याप सिलिंडरपासून वंचित आहेत.
ठळक मुद्देउज्ज्वला योजना : जिल्ह्यात ४ लाख ९४ हजार ४८४ शिधापत्रिकाधारक