शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
2
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
3
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
4
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
5
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
6
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
7
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
8
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
9
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
10
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
11
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
12
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
13
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
14
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
15
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
16
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
17
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
18
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
19
India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
20
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार

पीकविम्याकडे निम्म्या शेतकऱ्यांची पाठ !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 4:39 PM

Chandrapur : नागभीड तालुक्यात १४,२८२ शेतकऱ्यांनीच काढला विमा

घनश्याम नवघडेलोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड तालुक्यात पीकविम्याकडे निम्म्या शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. नागभीड तालुक्यात २७ हजार ८०० शेतकरी खातेदार आहेत. मात्र, ११ जुलै २०२४ पर्यंत १४ हजार २८२ शेतकऱ्यांनीच पीकविमा काढला आहे.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेची शासनस्तरावरून मोठ्या प्रमाणावर जाहिरात करून एक रुपयांत पीकविमा काढण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यावर्षी १५ जुलै २०२४ ही पीकविमा भरण्याची शेवटची तारीख आहे. राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवीत आहे. एक रुपयात पीकविमा ही योजना त्यापैकीच एक योजना. या योजनेची जाहिरात शासनाकडून मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. या जाहिरातीवरून शेतकरीही पोर्टलवर नोंदणी करून पीकविमा काढत आहेत. जे शेतकरी बँका आणि सोसायट्यांमार्फत पीककर्ज घेतात, त्यांच्या पीककर्जातून पीकविम्याची रक्कम कपात करण्यात येते. वैयक्तिकरीत्याही काही शेतकरी पीकविमा काढत आहेत. एक रुपयात पीकविमा, अशी जाहिरात शासनाकडून करण्यात येत असली तरी पूर्ण कागदपत्रांसाठी १०० ते १५० रुपये यासाठी खर्च होत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, या योजनेच्या जाहिरातीमध्ये भात पीक वगळून असा एक उल्लेख करण्यात आला आहे. यावरून अनेक शेतकऱ्यांमध्ये संदेह निर्माण झाला आहे. मागील वर्षीच्या पत्रकात भात, ऊस व ताग असा उल्लेख करण्यात आला होता. याकडे 'लोकमत'ने लक्ष वेधले होते. यावर्षी ऊस व ताग हे शब्द जाहिरातीतून वगळण्यात आले असले, तरी भात हा शब्द कायम आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पीकविम्याबद्दल संभ्रम कायम आहे.

कंपनी लाभ देत नाहीया तालुक्यात दरवर्षी निसर्गाच्या अव- कृपेमुळे, कधी विविध रोगांच्या आक्र मणामुळे तर कधी अन्य कारणांमुळे धान पिकाचे उत्पादन निम्म्यावर होत असते. असे असूनही पीकविमा कंपनी शेतकऱ्यांना कोणताच लाभ देत नाही. त्यामुळे शेतकरी पीकविमा काढण्यास टाळाटाळ करतात, अशी शेतकऱ्यांमध्ये ओरड आहे.

लोनमुळे वाढला आकडाअनेक शेतकरी तालुक्यातील सेवा सहकारी सोसायट्यांचे सभासद आहेत. हे शेतकरी सोसायट्यांकडून पीककर्ज उचलत असतात. त्यांच्या पीककर्जातून विम्याची रक्कम कपात करण्यात येते. शिवाय बँकांकडूनही पीककर्ज देण्यात येते. बँकांही पीककर्जातून पीकविम्याची रक्कम कपात करीत असतात. त्यामुळेच हा आकडा १४ हजारां- पर्यंत गेला अशी यासंदर्भात चर्चा आहे.

"नागभीड तालुक्यात २७ हजार ८०० शेतकरी सभासद आहेत. त्यापैकी ११ जुलैपर्यंत १४ हजार २८२ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. १५ जुलैपर्यंत शेतकऱ्यांचे प्रमाण आणखी वाढेल."- शिवकुमार पुजारी, तालुका कृषी अधिकारी नागभीड. 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाAgriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीchandrapur-acचंद्रपूर