भारतीय मानक ब्यूरो नागपूरतर्फे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण
फोटो
भद्रावती: ग्राहक पंचायत भद्रावती यांनी हॉलमार्किंग जागरूकता, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला भारतीय मानक ब्यूरो, नागपूर यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षणकरिता प्राचारण करण्यात आले होते.
१६ जून २०२१ पासून सोन्याच्या दागिन्यांवर आणि सोन्यावर हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले होते. परंतु हॉलमार्किंगविषयी ग्राहक आणि ज्वेलर्स यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन ग्राहक पंचायत भद्रावती यांनी भारतीय मानक ब्यूरो, नागपूर यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षणकरिता प्राचारण केले.
यावेळी ग्राहक आणि ग्राहक संरक्षण कायदा २०१९ याबद्दल विशेष माहिती भारतीय मानक ब्यूरो, नागपूरचे अधिकारी सर्वेश त्रिवेदी यांनी दिली. पियूष वासेकर, विजय नितनवरे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
यावेळी पुरुषोत्तम मत्ते, तहसीलदार महेश शितोळे, गजानन पांडे, डॉ. माला प्रेमचंद, सुनीता खंडाळकर, कल्याणी मुटे, किशोर मुटे यांची उपस्थिती होती.
020921\img-20210902-wa0000.jpg
हॉल मार्किंग जागृकता अभियानाला उपस्थित मान्यवर