आवाळपूर : कोरोनाने जिल्ह्यातदेखील थैमान घातला. असंख्य नागरिकांना या संकटाचा सामना करावा लागला तर अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. अनेकाची छत्रसुध्दा हिरावली. त्यामुळे मुले रस्त्यावर आलीत. अशातच निराधार मुलांना डॉ. चांदेकर यांनी मायेचा हात दिला असून मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाचा काळ अनेकांना मोठा भयावह स्थितीत जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना याची झळ बसली असून अनेकांची छत्रदेखील हिरावले. कुणाचे आई, कुणाचे वडील तर कुणाचे आई-वडील दोन्हीं दगावले. यामुळे अनेक कुटुंबाचे आधारवड गेल्याने मुले निराधार झालीत. त्यांना अनेक विवंचनेचा सामना करावा लागत असून आर्थिक झळसुध्दा सोसावी लागत आहे.
अशा निराधार मुलांना आता एक मदतीचा हात पुढे आला असून नेहमी समाजकार्यात सहभाग घेऊन समाजाभिमुख कार्य करणारे डॉ. स्वप्नेश चांदेकर यांनी परिसरातील निराधार मुलांना मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोट
समाजहित जोपासत, आपणही समाजाच काही तरी देणं लागतो, या उद्देशाने कोरोना काळात परिसरातील जी मुले निराधार झाली, अशा मुलांवर मी मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे.
- डॉ. स्वप्नेश चांदेकर, नांदा फाटा