लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्मार्ट मोबाईलचा वापर जसजसा वाढत आहे. अशातच मोबाईल चोरीच्या घटनाही वाढत आहेत. विशेष म्हणजे, गर्दीच्या ठिकाणाहून मोबाईल चोरी होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाताना मोबाईल सांभाडणे गरजेचे आहे. सन २०२० मध्ये १ हजार ३४७ मोबाईल गहाळ झाल्याची पोलीस दफ्तरी नोंद आहे. साधारणतः दिवसातून चार मोबाईल चोरीला जात असल्याचे वास्तव आहे.स्मार्ट मोबाइल आता चैनीची वस्तू नाहीतर सर्वसामान्यांची गरज बनली आहे. संवादाचे प्रमुख माध्यम म्हणून मोबाईलकडे बघितले जाते. कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात झाल्याने तसेच अनेक खासगी कंपनीतील कामे ऑनलाईन सुरू झाल्याने लहान थोरापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांकडे स्मार्ट मोबाईल दिसून येतात. त्यामुळे मोबाईल चोरटे सुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. विशेष म्हणजे हे चोरटे गर्दीचे ठिकाणी संधी शोधून मोबाईल पळवीतात. चंद्रपुरात तर जबरीने मोबाईल पळविण्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. सायबर पोलिसांकडे आलेल्या तक्रारीवरून सन २०१९ मध्ये दोन हजार ९७९ तर २०२० मध्ये १३४७ मोबाईल गहाळ झाले आहेत. पोलिसांनी ऑनलाईन तपास करून ३० ते ४० टक्के मोबाईल शोधले आहेत.
७५६ मोबाईल शोधण्यात यशमोबाईल चोरी झाल्यानंतर संपूर्ण कागदपत्राच्या आधारे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर हा तपास सायबर विभागाकडे जातो. तक्रार मिळताच पोलीस मोबाईल ट्रेस करतात. मोबाईल ट्रेस झाल्यानंतर पोलिसांना शोध लावणे शक्य होते. सन २०१९ मध्ये दोन हजार ९७९ पैकी १४८० तर सन २०२० मध्ये १३४७ पैकी ६५६ मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.
याठिकाणी सांभाळा मोबाईलचंद्रपूर येथील बस स्थानक, रेल्वे स्थानक येथून मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरी गेल्याची तक्रार आहेत. यासोबतच चंद्रपुरातील गोल बाजार, भाजी बाजार येथून मोबाईल चोरी गेल्याच्या तक्रारी आहेत. तर बाबुपेठ येथून जबरीने मोबाईल पळवल्याचाही तक्रारी आहेत.
५० टक्के मोबाईलचा शोध लागतच नाहीमोबाईल चोरी केल्यानंतर संपूर्ण कागदपत्राच्या आधारे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणे गरजेचे असते. परंतु बहुतांश जणांकडे कागदपत्र नसल्याने तक्रार करत नाही. तर बहुतेकांनी तक्रार केल्यानंतरही मोबाईल ट्रेस होत नसल्याचे कारण पोलिसांकडून सांगण्यात येते. त्यामुळे चोरी गेलेल्या ५० टक्के मोबाईलचा शोध लागत नसल्याचे वास्तव आहे.
मोबाईल चोरीला जाताच हे करामोबाईल चोरीला गेल्यानंतर तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार करा. मोबाईलमधील ई-मेल व इतर पासवर्ड बदलून घ्यावे, ऑनलाईन बँकिंग असल्यास त्वरित संबंधित बँकेला याची कल्पना द्यावी, खात्यातील व्यवहार बंद करावेत. आपण वापरत असलेला मोबाईल क्रमांक ब्लॉक करावा जेणेकरून गैरवापर होणार नाही.