आॅनलाईन लोकमतकोठारी : येथील नऊ हातपंप आठ दिवसांपासून बंद असल्याची तक्रार पंचायत समितीला देऊनही ते याकडे लक्ष द्यायला तयार नाही. दुसरीकडे गावात पाण्यासाठी हाहाकार होत आहे. दरम्यान, शुक्रवारी हातपंप दुरुस्त करणारे वाहन गावात आले. मात्र या वाहनात दुरुस्तीचे साहित्यच नव्हते. त्यामुळे संतप्त सरपंच व गावकºयांनी वाहनातील कर्मचाºयांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून ठेवले.बल्लारपूर पंचायत समितीकडे गावातील आठ हातपंप दुरुस्ती करण्याकरिता ग्रामपंचायतीने दीड लाख रुपये जमा केले आहे. याला आठ दिवसांचा कालावधी लोटत असतानाही पंचायत समितीने हातपंप दुरुस्तीसाठी पाऊल उचलले नाही. गावातील महिला हातपंप दुरुस्ती कोठारीचे सरपंच मोरेश्वर लोहे यांनी पंचायत समितीला हातपंप दुरुस्तीचे वाहन पाठविण्याची अनेकदा विनंती केली. आठ दिवसानंतर गावात हे वाहन आले. मात्र हातपंप दुरुस्तीसाठी लागणारे साहित्यच त्यात नव्हते. त्यामुळे हातपंप दुरुस्त होऊ शकले नाही. यामुळे संतप्त सरपंचांनी वाहन चालक ए. के. शिडाम, मजूर नामदेव सोनवणे, देवराव तांबडकर व नितेश उईके यांना ग्रा.पं. सभागृहात कोंडून ठेवले. जोपर्यंत पूर्ण साहित्यानिशी वाहन येणार नाही व हातपंप दुरुस्त करण्याची कार्यवाही सुरू होत नाही. तोपर्यंत सोडणार नाही, अशी भूमिका सरपंच मोरेश्वर लोहे, ग्रा.पं. सदस्य अमोल कातकर यांनी घेतली. दरम्यान, याची माहिती सभापती गोविंदा पोडे यांना मिळाली. त्यांनी याबाबत संवर्ग विकास अधिकारी संध्या दिकोंडवार यांना कळविले. दोघांनीही या प्रकरणात मध्यस्थी केल्यानंतर तब्बल चार तासानंतर ग्रामपंचायत कार्यालयात बंदिस्त कर्मचाऱ्यांची सुटका केली.गावात तीव्र पाणी टंचाई आहे. गावकरी केवळ हातपंपांवर विसंबून आहेत. नवीन नळयोजना गावकऱ्यांच्या सेवेत कधी येणार, हे जीवन प्राधिकरण विभाग स्पष्टपणे सांगत नाही. पंचायत समितीकडे हातपंप दुरुस्तीची रक्कम जमा केली आहे. तरीही सहकार्य करीत नाही.- मोरेश्वर लोहे, सरपंच ग्रा.पं. कोठारीजि.प.कडे हातपंप दुरुस्ती करण्याचे साहित्य मागविले आहे. मात्र त्यांच्याकडून पुरवठा होऊ शकला नाही. तात्पुरती दुरुस्ती करण्यासाठी वाहन व कर्मचारी पाठविले होते. मात्र त्यांच्याकडे साहित्य नव्हते. ग्रामपंचायतीने एक लाख रुपये २१ डिसेंबरला जमा केले.- संध्या दिकोंडावार, संवर्ग विकास अधिकारी पं.स. बल्लारपूर.
हातपंप दुरुस्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोंडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 11:47 PM
येथील नऊ हातपंप आठ दिवसांपासून बंद असल्याची तक्रार पंचायत समितीला देऊनही ते याकडे लक्ष द्यायला तयार नाही.
ठळक मुद्देसाहित्याविनाच आले वाहन : नऊ हातपंप आठ दिवसांपासून बंद