लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : हिंगणघाट येथील जळित कांडातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी सोमवारी जिल्ह्यातील विविध संस्था, संघटना, महिला मंडळांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.शिक्षक भारती चिमूरचिमूर : येथील शिक्षक भारतीच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना निंदनीय आहेत. या घटनांवर निर्बंध घालण्यासाठी शासनाने उपाययोजना करावी, नराधमांवर कठोरातील कठोर कारवाई करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. नायब तहसिलदार तुशळीदास कोवे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी शिक्षक भारतीचे विभागीय सचिव तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष, माध्यमिक अध्यक्ष भास्कर बावनकर, सल्लागार धनराज गेडाम, तालुका अध्यक्ष रावन शेरकुरे, रमेश दांडेकर, चंद्रशेखर नन्नावरे, बंडू नन्नावरे, प्रभाकर दडमल, दुर्योधन रोकडे, संदीप उपरे, संजय बन्सोड आदी उपस्थित होते.चिमूर तहसीलवर मुकमोर्चाचिमूर : चिमूर तालुका कुणबी समाज संघटना व सर्व पक्षाच्या वतीने मुकमोर्चा काढून निषेध नोंदविण्यात आला. कुणबी समाज व सर्व पक्षाच्या वतीने मंगळवारी दुपारी अडीच वाजता गुरुदेव सांस्कृतिक भवण वडाळा ( पैकु) चिमूर त तहसील कार्यालयापर्यंत मुक मोर्चा आयोजन केले होते. मोर्चात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग होत आपल्या संताप व्यक्त केले. यावेळी अनेकजण सहभागी झाले होते.बहुजन महिला आघाडी, भद्रावतीआयुधनिर्माणी (भद्रावती): हिंगणघाट व औरंगाबाद प्रकरणातील आरोपींना भरचौकात फासावर लटकवावे, अशी मागणी बहुजन महिला आघाडी शाखा, भद्रावती तर्फे करण्यात आली. या घटनांचा निषेध करीत महिला आघाडी तालुका शाखा भद्रावती तर्फे तहसिलादारांना निवेदन देण्यात आले. शिष्टिमंडळात महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष संध्या पेटकर, नगरसेविका राखी रामटेके, सीमा ढेंगळे, सुप्रिया चहांदे, रंजना पाटील, सुकेशिनी चहांदे, आरती पाटील, रजनी रामटेके, सरोज खोब्रागडे, पौर्णिमा पाटील, पद्मा येलनदुल्ला, ललिता ताडे, चंद्रकला गेडाम, उषा सातपुते, प्रिया कांबळे, सपना रामटेके, वैशाली चिमुरकर, रंजना पेटकर, संगीता रामटेके, पुष्पा हस्ते, जया बांबोडे, लता टिपले, कविता गौरकर, पुष्पा हस्ते, शालू मानकर, संध्या बोरे, बिता मेश्राम, दीक्षा उमरे, मिली वाघ, कविता नगराळे, शिला दहिवळे, देविका वनकर, लता टिपले महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.सावलीत ओबीसी कृती समितीचे निवेदनसावली : येथील ओबीसी कृती समितीच्या वतीने उषा भोयर यांच्या नेतृत्वामध्ये तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.यावेळी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. नायब तहसीलदार कांबळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सरपंच उषा भोयर यांच्यासह पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, नगराध्यक्ष विलास यासलवार, पं.स. सदस्य मनिषा जवादे, सरपंच राजेश सिद्धम, नगरसेविका शिला शिंदे, नगरसेविका योगिता पुगदलवार, उर्मिला तरारे, दादाजी किनेकार, अॅड. बी.टी. लाडे, कविंद्र रोहनकर, किशोर घोटेकर, अनिल मशाखेत्री, रजनी भडके, नितीन गोहणे, प्रितम गेडाम, दीपक जवादे, भाऊराव कोठारे, मनोज चौधरी, खुशाल लोडे उपस्थित होते.
नराधमाला फाशी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 5:00 AM
नायब तहसिलदार तुशळीदास कोवे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी शिक्षक भारतीचे विभागीय सचिव तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष, माध्यमिक अध्यक्ष भास्कर बावनकर, सल्लागार धनराज गेडाम, तालुका अध्यक्ष रावन शेरकुरे, रमेश दांडेकर, चंद्रशेखर नन्नावरे, बंडू नन्नावरे, प्रभाकर दडमल, दुर्योधन रोकडे, संदीप उपरे, संजय बन्सोड आदी उपस्थित होते.
ठळक मुद्देएकमुखी मागणी : विविध संघटनांचे प्रशासनाला निवेदन