राजुरा: भारतीय जनता पार्टीचे राजुरा शहर अध्यक्ष तथा पत्रकार बादल बेले यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर रविवारी १२ जुलैला सकाळी ११ राजुरा येथे येत आहेत. स्थानिक शासकीय विश्रामगृहामध्ये यासंदर्भात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीला राजुराचे आमदार अॅड.संजय धोटे उपस्थित राहतील. या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अरुण मस्की यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)पोलीस शिपायाचे गैरवर्तनराजुरा येथील पत्रकार एम.के.शेलोटे हे राजुरा पोलीस ठाण्यात घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेले असता, पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलीस शिपायाने त्यांना ‘गेट आऊट’ म्हणून तेथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. या गैरवर्तनाचा पत्रकार संघटनेने निषेध केला असून यासंदर्भात उपविभागिय पोलीस अधिकारी राजरत्न बन्सोड यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. पत्रकारांवरील हल्ल्याच्या चौकशीची मागणीराजुरा येथील पत्रकारांनी शनिवारी उपविभागीय पोलीस अधिकारी राजरत्न बन्सोड यांची भेट घेऊन बादल बेले यांच्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रेटून धरली. यासोबतच पत्रकार एम.के.शेलोटे यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाची देखील चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी पत्रकार मसूद अहमद, महीसर गुंडेवीया, एम.के.शेलोटे, विकास कुंभारे, अनिल बाळसराफ, मंगेश बोरकुटे, मिलिंद देशकर उपस्थित होते.
हंसराज अहीर घेणार पत्रकारावरील हल्ल्याचा आढावा
By admin | Published: July 12, 2015 1:18 AM