चंद्रपूर : सोशल मीडियाद्वारे जगभराशी कनेक्ट होता येत असले, तरी सोशल माध्यमांवर महिलांना ट्रोल केल्या जात आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर महिलांच्या छळाच्या घटनांची संख्याही वाढत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, अनेक महिला कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी तक्रार करत नसल्याचेही चित्र आहे.
दिवसेंदिवस सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठसुद्धा याचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहेत; परंतु हेच माध्यम सोशल छळाचे अस्त्र बनू पाहत आहे. यामध्ये तरुणी व महिलांना टार्गेट केले जात आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन काळात अनेक महिलांचा सोशल मीडियावर छळ केला आहे.
बॉक्स
सोशल मीडियावर महिलांना व मुलींना सतत मेसेज पाठवणे, विविध इमोजी पाठवून त्यांना त्रास दिला जातो. मात्र, अनेक महिला व मुली त्याची तक्रार करण्याचे सोडून त्याला टाळत असतात, तर बहुतेक मुली व महिलांना कुटुंबाची बदनामीची होईल, अशी भीती वाटते. त्यामुळे आरोपीचे फावते. मात्र, बिनधास्तपणे तक्रार करणे गरजेचे आहे.
कोट
महिला व मुलींचा सोशल मीडियावर जर छळ होत असेल तर न घाबरता जवळील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी. सोशल मीडियावर पाठवलेले मेसेज किंवा व्हिडिओ डिलिट करू नये, ते सर्व सायबर पोलिसांना दाखवावे. त्यामुळे त्या आरोपीला शोधण्यास पोलिसांना मदत मिळत असते.
-अश्विनी वाकडे,
पोलीस उपनिरीक्षक, भरोसा सेल
कोट
सोशल मीडिया या माध्यमांवर महिलांचा छळ होणे ही निंदनीय बाब आहे. त्यांच्या हक्कासाठी आमचा संघर्ष नेहमी सुरूच असतो. जर महिलांचा छळ होत असेल तर न घाबरता पोलिसांत तक्रार करावी, आम्ही मुलींच्या किंवा महिलांच्या पाठीशी राहू.
- सुनीता गायकवाड,
मनसे जिल्हाध्यक्ष तथा अध्यक्ष नारी सेना चंद्रपूर
बॉक्स
सोशल मीडियावर अनेक महिलांना वारंवार मेसेज करणे, नंबर मागणे, कॅाल करून त्रास दिल्या जातो.
असा प्रकार घडल्यास न घाबरता जवळील पोलीस स्टेशनमध्ये किंवा महिला सेलला तक्रार करता येते.
सायबर विभागाकडेसुद्धा तक्रार करता येते. त्याची आयडी शोधून त्याच्यावर कारवाई करता येते.