मेंडकी उपपोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या हळदा (आवळगाव) येथील हरबच्चन सिंग गुरुदीप सिंग टांक या इसमाच्या नावाने बनावट फेसबुक आयडी तयार करुन त्चंद्रपूर : गुरूवारपासून गणेशोत्सवाला सुरूवात झाली असून गणेशोत्सवादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तब्बल तीन हजारच्यावर पोलीस कर्मचारी तैणात करण्यात आले आहेत. यात पोलीस दल, गृहरक्षक दल, आणि आयटीबीटीच्या (इंदौर तिबेटीयन बॉर्डर पोलीस) एका तुकडीचा समावेश आहे. गणेशोत्सव शांततेत साजरा केला जावा यासाठी १५० पोलीस अधिकारी, दोन हजार ७०० पोलीस कर्मचारी, यासोबतच गृहरक्षक दलाचे ७०० जवान तैनात करण्यात आले आहेत. यात ६०० पुरूष व १०० महिलांचा समावेश आहे.जिल्ह्यात दीड हजारावर सार्वजनिक गणपतीची तर १० हजारांपेक्षा अधिक घरगुती गणपतींची स्थापना झाली आहे. अनेक मंडळानी लांबवर रोषणाई लावून आकर्षक देखावे सादर केले आहेत. त्यामुळे सायंकाळाच्या सुमारास दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसून येते. जिल्ह्यात दरवर्षीच मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यातही चंद्रपूर शहरातील गणेशोत्सव जिल्हाभरातील भक्तांच्या आकर्षणाचा विषय असतो. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी तर जिल्ह्यातील भाविकांची अलोट गर्दी उसळते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उत्सवादरम्यान, कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तगडा बंदोबस्त लावल्याची माहिती जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल ताजने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मेंडकी उपपोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या हळदा (आवळगाव) येथील हरबच्चन सिंग गुरुदीप सिंग टांक
By admin | Published: September 19, 2015 1:28 AM