सध्याचे जीवन धकाधकीचे आहे. स्पर्धेचे आहे. अशावेळी जगताना अनेक अडचणी येतात. मात्र प्रत्येक अडचणीतून मार्ग निघतोच. त्यामुळे लोकांनी आयुष्यात नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा. तसे केल्यास त्याचा फायदा निश्चितच आपल्याला होतो, असे मत महापालिकेचे बांधकाम अभियंता अनिल घुमडे यांनी मकरसंक्रांतीच्या पर्वावर लोकमतशी बोलताना व्यक्त केले.यावेळी ते म्हणाले, राग हा मानवाचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्यामुळे त्याच्यापासून मानवाने लांबच राहिले पाहिजे. राग, द्वेश, मत्सर बाजुला सारून आनंदमय व समाधानी आयुष्यासाठी प्रयत्न राहण्याचा संकल्प करणे म्हणजेच खरी मकरसंक्रांत. नाण्याच्या दोन बाजु असतात. त्यामुळे या दोन्ही बाजु तपासूनच लोकांनी कुठल्याही बाबतीत निर्णय घ्यावा. धकाधकीचे जीवन असल्याने नियमित व्यायाम, योगासने करून आपल्या शरिरावरही प्रत्येकाने प्रेम करावे, असेही घुमडे म्हणाले.बांधकाम विभागाशी निगडित विषयावर बोलताना अनिल घुमडे म्हणाले, चंद्रपुरात नेहमीच पाणी टंचाई जाणवते. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरातील इमारतधारकांनी आपल्या इमारतीत रेन वॉटर हॉर्वेस्टिंग सिस्टीम बसवावी. याबाबत नागरिकांनी गंभीर होणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.मकरसंक्रांतीनिमित्त अनिल घुमडे यांनी युवकांनाही संदेश दिला. ते म्हणाले, सध्या अनेक युवक थोड्या अपयशामुळे लवकरच नैराश्येच्या गर्तेत जाताना दिसतात. मात्र युवकांनी जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास व संयम या गोष्टी बाळगाव्या. यश निश्चितच मिळते.
आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन बाळगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 11:17 PM
सध्याचे जीवन धकाधकीचे आहे. स्पर्धेचे आहे. अशावेळी जगताना अनेक अडचणी येतात. मात्र प्रत्येक अडचणीतून मार्ग निघतोच. त्यामुळे लोकांनी आयुष्यात नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा. तसे केल्यास त्याचा फायदा निश्चितच आपल्याला होतो, असे मत महापालिकेचे बांधकाम अभियंता अनिल घुमडे यांनी मकरसंक्रांतीच्या पर्वावर लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
ठळक मुद्देराग, द्वेश, मत्सर हे मानवाचे शत्रू