लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वंचितांना घरकुल मिळावे, यासाठी शासनातर्फे रमाई आवास, मोदी आवास, शबरी घरकुल आवास आदी योजना राबविल्या जातात. २०१६ ते २०२४ या कालावधीसाठी चंद्रपूर जिल्ह्याला रमाई आवास योजनेंतर्गत २५ हजार १४४ लाभार्थीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर शबरी योजनेंतर्गत २२ हजार ७६५ लाभार्थीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. दोन्ही योजनांची उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे बेघरांना मोठा आधार मिळाला आहे.
शासनाने रमाई, शबरी योजनेंतर्गत लाभार्थीना घरकुल मंजूर केले असले तरीही जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव झाले नाही. परिणामी घरकुलासाठी लाभार्थीना रेती मिळणे कठीण झाल्याने अनेक घरे अपूर्ण आहेत
वर्ष रमाई योजना उद्दिष्ट मंजूर शबरी योजना उद्दिष्ट मंजूर२०१६-१७ १२५२ ७८८२०१७-१८ २००० १७२ २०१८-१९ ८७४१ १७२२०१९-२० ६८८० ४०५० २०२१-२२ ३४५६ ८३४२०२३-२४ २८२५ ८६६६एकूण २५१५४ २३१८२
निकष काय?■ शबरी योजना : आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थीसाठी, तसेच आदिवासी बाह्य क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थीना घरकुल उपलब्ध करण्यात येते.
■ रमाई योजना : अनुसूचित जाती नवबौद्ध कुटुंबाचे राहणीमान उंचावे व त्याचे निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागामध्ये त्याच्या स्वतःच्या जागेवर किंवा कच्च्या घराच्या जागेवर २६९ चौरस फुटांचे पक्के घर बांधावे लागते.
अडचण काय?■ जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असले तरी अनेक गावांतील घरकुल लाभार्थीना मोफत रेती उपलब्ध झाली नाही.■ पावसाळ्यापूर्वी घरकुलाचे काम पूर्ण कसे करायचे, या विवंचनेत लाभार्थी सापडले आहेत. जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी आहे.
अर्ज कोठे करायचा?पंचायत समिती, नगर परिषद, जिल्हा परिषद, डीआरडीए, या ठिकाणी घरकुलाच्या लाभासाठी अर्ज करता येतो. ग्रामपंचायत कार्यालयातही अनेकजण अर्ज करतात. सर्व दस्तऐवज जोडून अर्ज करावा लागतो.