लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चारा आणण्यासाठी जंगलात गेलेल्या इसमावर वन्यप्राण्याने हल्ला करून ठार केले. ही घटना बुधवारी घडली. हल्लेखोर वाघ किंवा बिबट असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.राजेश नागेश्वर गुजलेवार (३५) रा. वीर सावरकर नगर, चंद्रपूर असे मृताचे नाव आहे. चंद्रपूर वन परिक्षेत्रातील दुर्गापूर बिटात कक्ष क्रमांक ३९९ मध्ये राजेश नागेश्वर गुजलेवार व हरेन नारायण जोगदार (५५) रा. चंद्रपूर हे दोघेही जनावारांसाठी चारा आणण्यासाठी जंगलात गेले होते. अचानक राजेश गुजलेवार याच्यावर वन्यप्राण्याने हल्ला केला. यात राजेशचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. चंद्रपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, क्षेत्र सहायक भुषण गजपुरे, वनरक्षक अमोल कवासे, यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. मृताच्या कुटुंबीयांना तत्काळ दहा हजारांची मदत देण्यात आली. सदर हल्लेखोर वन्यप्राणी वाघ अथवा बिबट असावा, असा अंदाज वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी लोकमतशी बोलताना वर्तविला.रानडुकराचा हल्ल्यात विद्यार्थी जखमीनागभीड : शेतावर गेलेल्या विद्यार्थ्यावर रानडुकराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी नागभीड शिवारात संध्याकाळी ४ वाजता घडली. कल्पेश ब्रम्हदेव कामडी (१७) असे या जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. तो येथील कर्मवीर विद्यालयाचा विद्यार्थी आहे. कल्पेश आपल्या अन्य एका मित्रासोबत नागभीडलगत असलेल्या शेतात गेला होता. यावेळी अचानक डुकराने त्याच्यावर हल्ला केला. यात त्याच्या पायाला जबर दुखापत झाली. त्याला येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर वनविभागाला कळविण्यात आले. वनपाल ए.एस.सय्यद व वनरक्षक आर.बी. वगारे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला आहे. मदतीची मागणी आहे.
वन्यप्राण्याच्या हल्ल्यात इसम ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 10:52 PM
चारा आणण्यासाठी जंगलात गेलेल्या इसमावर वन्यप्राण्याने हल्ला करून ठार केले. ही घटना बुधवारी घडली. हल्लेखोर वाघ किंवा बिबट असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.
ठळक मुद्देहल्लेखोर वाघ किंवा बिबट