बॉक्स
कोरोनाची दहशत असताना घरचे कामावर जाऊ नये, म्हणून सांगत होते. मात्र, राष्ट्रहिताचे काम म्हणून परिचारिका म्हणून काम करीत होते. मात्र, रुग्ण कमी झाले म्हणून माझ्यासह इतरही परिचारिका यांना कामावरून कमी करण्यात आले.
-परिचारिका
----
जीव धोक्यात घालून सेवा बजावत होतो. कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तीकडे त्यांचे कुटुंबीय दुर्लक्ष करीत होते. मात्र, आम्ही त्यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करीत होतो. परंतु, आता आम्हांला कामावरून कमी केले आहे. काही कर्मचाऱ्यांना तर एक महिन्यातच कमी करण्यात आले.
-----------
कंत्राटी कर्मचारी
कोविड सेंटरमध्ये सिक्युरिटी गॉर्ड म्हणून काम करीत होतो. यावेळी रुग्ण कक्षाच्या बाहेर जाऊ नये व बाहेरील व्यक्ती आत येऊ नये, म्हणून दक्षता बाळगत होतो. अनेकदा वादही झाले. परंतु, कर्तव्य प्रामाणिक बजावले. परंतु, रुग्ण कमी होताच आम्हांला कमी करण्यात आले.
-सिक्युरिटी गार्ड