शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

मुख्याध्यापक जोमात, तर विद्यार्थी कोमात

By admin | Published: February 13, 2017 12:38 AM

विद्यार्थ्यांच्या सर्वांगिन विकासासाठी शासन कट्टीबद्ध आहे. मात्र मुख्याध्यापकांच्या मनमानी कारभाराने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आल्याची स्थिती तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये दिसून येत आहे.

गोंडपिंपरी तालुक्यातील जि. प. शाळांतील प्रकार : मुख्याध्यापकांचा मनमानी कारभारआकाश चौधरी गोंडपिपरीविद्यार्थ्यांच्या सर्वांगिन विकासासाठी शासन कट्टीबद्ध आहे. मात्र मुख्याध्यापकांच्या मनमानी कारभाराने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आल्याची स्थिती तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये दिसून येत आहे. शाळेच्या कार्यालयीन कामाच्या नावावर आपल्या वैयक्तिक कामासाठी मुख्याध्यापक पसार होत आहेत. त्यामुळे मुख्याध्यापकांकडे वर्ग असलेल्या मुलांची शैक्षणिक प्रगती अतिशय बिकट होत चालली आहे. त्यामुळे विद्यार्थी कोमात दिसून येत असून मुख्याध्यापक मात्र आपआपली वैयक्तिक कामे करण्यासाठी जोमात दिसून येत आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांकडून असला प्रकार सुरू आहे. यामुळे पालकांमध्ये रोष पसरला आहे. गोंडपिपरी तालुक्यात ८५ प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. यापैकी कित्येक शाळेतील मुख्याध्यापक ५० ते ६० किमी अंतरावरुन ये-जा करतात. यामुळे वैयक्तिक कामे करण्यास ते असमर्थ ठरत आहेत. या वैयक्तीक कामावर मात करण्यासाठी अनेक मुख्याध्यापकांनी नवी शक्कल लढविली आहे. मिटींग, लाईट बिल, प्रपत्र तर कधी आॅनलाईन माहितीचा बहाना सांगत हलचल रजिस्टरवर नोंद न करता घरी परस्पर पसार होत असतात. मिटींग अथवा काही कार्यालयीन काम असले तरी पहिले शाळेत येवून हलचल रजिस्टरवर नोंद करून कार्यालयीन कामासाठी बाहेर पडणे व काम संपल्यावर शाळेत येवून पुन्हा हलचल रजिस्टरवर सह्या करणे अनिवार्य आहे. मात्र या नियमांना बगल देत कित्येक मुख्याध्यापकांनी शाळा बुडवून वैयक्तीक कामे करण्याची सवय लावल्याने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचा बट्याबोळ झाल्याचे दिसून येत आहे. काही मुख्याध्यापकांनी तर चक्क आपल्याकडे असलेले विषय व इतर काही कामे दुसऱ्या शिक्षकांवर लादत आहेत. यामुळे त्या शिक्षकांवर अधिकचा भार पडत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबाबत काही येत नसल्यास शिविगाळ करणे, धमकावणे असेही प्रकार सुरू आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)कार्यालयीन कामाच्या नावावर अनेक शाळेतील मुख्याध्यापक शाळेला बुट्ट्या मारून आपले वैयक्तिक कामे करताना पहायला मिळत आहे. या मुख्याध्यापकांवर शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने मनमानी कारभार सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य अंधारात येण्याची वेळ ओढावली आहे. अशा मुख्याध्यापकांची चौकशी करून कार्यवाही करणे गरजेचे आहे.- सुरेश चरडे, नगरसेवक, गोंडपिपरीमुख्याध्यापकांनी कुठलेही कार्यालयीन काम असो, त्यांनी आपल्या शाळेतील सहकारी शिक्षकांना सांगून हलचल रजिस्टरवर नोंद करून जाणे आवश्यक आहे यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समितीला कळवणेही आवश्यक आहे. असले प्रकार सुरू असतील तर चौकशी करून दोषी मुख्याध्यापकांवर कार्यवाही करू.- झावरू उराडे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, गोंडपिपरी