चंद्रपुरातून सुरूवात : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यशाळाचंद्रपूर : शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषदतर्फे नुकतीच जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांची सहविचार सभा सरदार पटेल महाविद्यालय येथे झाली.या सभेत जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी देवेंदर सिंह, शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, गारकर, प्रा. गुरु यांची उपस्थिती होती. सीईओ देवेंदर सिंह यांनी आपल्या मार्गदर्शनातून गुणवत्ता वाढ, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रयाबाबत मार्गदर्शन केले. तसेच शौचालय व स्वच्छता अभियान याबाबत विशेष मर्गदर्शन करून या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. शिक्षणाधिकारी गौरकर यांनी आरटीई कायद्याबद्दल मार्गदर्शन केले.तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून संग्रहीत केलेले शासनाचे शाळेला आवश्यक सलेले शासन निर्णय लॉपटाप प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखविण्यात आले. तसेच शासनाकडून वेळोवेळी मागितली जाणारी शाळेची माहिती एकदाच मागण्यासाठी पी-१ ते पी-२९ यापत्रात मागण्याकरिता सर्वांना ई-मेलद्वारे प्रपत्र पाठवून माहिती मागविण्यात आली. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र आता माध्यमिक विभागाकरिता शासन लवकरच शासन निर्णय काढणार असल्याने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यशाळेची सुरुवात चंद्रपुरात होत असून येत्या ३० जुलैपर्यंत सदर कार्यशाळा होणार असल्याचे सांगितले. सभेत शिक्षणाधिकारी डोर्लीकर स्वत: ‘एकच ध्यास गुणवत्ता विकास’ हे शैक्षणिक घोषवाक्य म्हणत होते. सभेत चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यात आलेले ५०० मुख्याध्यापक उत्साहाने सायंकाळपर्यंत उपस्थित होते. आठ तास चाललेल्या सभेत मार्गदर्शक संजय डोर्लीकर यांनी संपूर्ण माहिती प्रोजेक्टर व लॅपटापच्या माध्यमातून दाखविल्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी व शाळेचे उत्तम प्रशासन चालविण्यासाठी सुलभ झाल्याचे मत मुख्याध्यापकांनी व्यक्त केले. सभेचे संचालन प्राचार्य स्मिता ठाकरे यांनी तर आभार विस्तार अधिकारी प्रकाश महाकाळकर यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)
माध्यमिक शिक्षण विभागातर्फे मुख्याध्यापकांची सहविचार सभा
By admin | Published: July 20, 2016 12:45 AM