संघटनेच्या समस्या निवारण दौऱ्याअंतर्गत जिल्हा सरचिटणीस किशोर उरकुंडवार, सल्लागार मारोती जिल्हेवार व तालुकाध्यक्ष लक्ष्मण सोयाम यांच्या नेतृत्वात संघटनेच्या शिष्टमंडळाने पंचायत समिती मूलचे गटशिक्षणाधिकारी वैभव खांडरे यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. शाळांना शासनाकडून वेळोवेळी मिळालेले बरेच जुने साहित्य निरुपयोगी झाल्याने पडून असतात. अशा साहित्याचे निर्लेखन करण्यासाठी शाळा व तालुका स्तरावर समिती गठित करावयाची आहे. सदर कार्यवाही करताना शाळांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेची गरज संघटनेने प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. या सूचनेचे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी स्वागत केले असून लवकरच कार्यशाळा घेण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी शिष्टमंडळाच्या चर्चेत संघटनेचे तालुका सरचिटणीस चंदन बिलवणे, सुरेश जिल्हेवार, विजय पोलोजवार, पंतोजी शेंडे, अरविंद मेश्राम आदी पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
साहित्य निर्लेखनाकरिता मुख्याध्यापकांची कार्यशाळा घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 4:19 AM