गावातील नागरिकांसोबत गावातील प्रतिष्ठित सभासदांनी रक्तकांचन, चिचवा, अमलताश, बहावा, बेहडा, मोह, टेंबुर्णी ही झाडे लावली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचगाव येथे आरोग्य तपासणी करण्यात आली. एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र उपजिल्हा रुग्णालय वरोराचे समुपदेशक गोविंद कुंभारे, पंकज टिपले, प्रयोगशाळा तंत्रज्ञ चंदा उमक, तसेच टाटा ट्रस्ट कॅन्सर केअर फाउंडेशन चंद्रपूरचे डॉ.आशिष, डॉ.सूरज साळुंके, निरंजन मांगरुळकर, स्टाफ नर्स अर्पणा चांदूरकर हे यावेळी उपस्थित होते.
ग्रामपंचायत पाचगावच्या सरपंच किरण ढोक, उपसरपंच मारोती जांभुळे, सदस्य वासुदेव शेंडे, सविता नन्नावरे, प्रतिभा झाडे, रोशन खोंडे, प्रदीप ढोक, अंबुजा फाउंडेशनचे प्रक्षेत्र अधिकारी ज्योती आवारी आणि गुरुदेव सेवा मंडळाचे सभासद या शिबिरात उपस्थित होते.
050921\img_20210905_133538.jpg
warora