चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिका झोन क्र. ३ क बंगाली कॅम्प येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण कक्ष, जिल्हा सामान्य रूग्णालय चंद्रपूर नोबेल शिक्षण संस्था, आश्रय ट्रकर्स प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने सफाई कामगार, स्वच्छता कर्मचारी, घंटा गाडी, नाली सफाई कर्मचारी यांच्याकरिता एचआयव्ही, एड्स आजाराविषयी जनजागृतीपर माहिती देऊन एचआयव्ही , एड्स होण्याचे कारणे तथा प्रतिबंधात्मक उपायांबाबत नोबेल शिक्षण संस्थेचे प्रकल्प उपदेशक वसंत भलमे यांनी मार्गदर्शन केले. कोव्हीड १९ विषयी सावधगिरीचे उपाय तसेच मास्कचा नियमित वापर करणे, स्वच्छता पाळणे, हात वारंवार धुणे या बाबत मार्गदर्शनपर माहिती दिली.
शिबिरात ६१ व्यक्तींची ब्लडप्रेशर व एचआयव्ही तपासणी करण्यात आली. या प्रसंगी राकेश दुर्योधन, अनिल ढवळे, अनिल उईके, अविनाश सोमनाथे, पवनकांत, गणेश अक्कुलवार प्रामुख्याने उपस्थित होते.