जिवती : एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र, ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर व संकल्प बहुउद्देशीय ग्राम विकास संस्था चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने जिवतील तालुक्यातील शेणगाव येथे जागतिक एड्स दिन पंधरवाड्याच्या निमित्ताने आरोग्य तपासणी शिबिर नुकतेच पार पडले. या शिबिरात ४५ जणांची रक्त तपासणी करण्यात आली. शिबिरात आयसीटीसी समुपदेशक आस्मा पठाण यांनी कोरोना काळात स्वतःला जपण्यासाठी काय उपाययोजना करायच्या याबाबत मार्गदर्शन केले. तसेच एच.आय.व्ही., एड्स ,क्षयरोग या दुर्धर आजाराबाबत माहिती दिली. तसेच अशा आजारापासून स्वतःचे रक्षण करण्याकरिता प्रतिबंध म्हणून स्वतःची रक्त तपासणी करण्याचे आवाहन केले. लिंक वर्कर प्रकल्पाचे लिंकवर्कर अशोक शिंदे यांनी विविध आजाराची माहिती असलेले पत्रक वाटप करून जनजागृती केली. यावेळी गावातील एकूण ४५ नागरिकांची रक्त तपासणी करण्यात आली. याप्रसंगी शेणगावचे सरपंच महेश मेश्राम, समुपदेशक अस्मा पठाण, प्रयोगशाळा तंत्रज्ञ शिल्पा साळवे, संकल्प बहुउद्देशीय ग्राम विकास संस्थेचे लिंक वर्कर अशोक शिंदे आदी उपस्थित होते.
शेणगाव येथे आरोग्य तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 4:42 AM