लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आदेशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली यांच्या वतीने जिल्हा कारागृह चंद्रपूर येथे बंदी असलेल्या महिला व त्यांच्या मुलांकरिता आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. जी. कांबळे होते. प्रमुख अथिती म्हणून कारागृह अधीक्षक डॉ. बी. एन. ढोले, गडचिरोलीच्या खुल्या कारागृहाचे वरिष्ठ तुरुंगाधिकारी बी. सी. निमगडे, तुरंगाधिकारी विठ्ठल पवार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे धाबेकर, अधीक्षक सोनकुसरे, अॅड. जयश्री मोगरे, अॅड. केदार, अॅड. मेश्राम, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या डॉ. दिप्ती श्रीरामे, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ञ्ज डॉ. विना बनसोडे, त्वचा व गुप्तरोग तज्ञ्ज डॉ. सुप्रिया सुटे , नेत्ररोग तज्ञ्ज डॉ. साची बंग, कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित डांगेवार, तुरुंग शिक्षक ललित मुंडे, महिला बाल कल्याण विभागातर्फे प्रिती उंदीरवाडे, संरक्षण अधिकारी प्रिया पिंपळशेंडे, समुपदेशक अंजु काळे आदी उपस्थित होते.यावेळी डी. जी. कांबळे यांनी उपस्थित महिलांना वैयक्तीक स्वच्छतेची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूने कैद्यांची आरोग्य तपासणी केली. त्यानंतर त्यांना योग्य मार्गदर्शन केले. प्रास्ताविक कारागृह वैद्यकीय अधीकारी डॉ. अमित डांगेवार यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन तुरुंग शिक्षक ललित मुंडे यांनी केले. यावेळी तुरुंगाधिकारी सुनील वानखडे, सुभेदार अशोक मोटघरे, हवालदार राजेंद्र देशमुख, रक्षक लवकुश चव्हान, महिला रक्षक रुपाली राठोड व कारागृहाचे इतर महिला रक्षक कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा कारागृहात आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 11:12 PM
राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आदेशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली यांच्या वतीने जिल्हा कारागृह चंद्रपूर येथे बंदी असलेल्या महिला व त्यांच्या मुलांकरिता आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
ठळक मुद्देमहिला कैद्यांना मार्गदर्शन : आरोग्य समस्यांवर दिली माहिती